hi Hindi en English mr Marathi ur Urdu
टॉप न्यूजताज्या बातम्या

श्रीमती राजश्री संजय कोळी यांची बॉम्बे ज्युडो असोसिएशनच्या कार्यकारी समितीवर नेमणूक

सर्व थरांतून होतोय अभिनंदनाचा वर्षाव !

प्रसिध्द अशा बॉम्बे ज्युडो असोसिएशनची आगामी पाच वर्षासाठीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. श्रीमती राजश्री संजय कोळी यांची या संस्थेच्या कार्यकारी समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती निमित्त सर्व थरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बॉम्बे ज्युडो असोसिएशनच्या अध्यक्षपदी कावस के. बिलिमोरिया यांची निवड झाली असून उपाध्यक्ष म्हणून सूर्यनारायण शर्मा, मुश्ताक अहमद, कौशिक जे. उमरानिया यांची निवड झाली आहे. सरचिटणीस म्हणून प्रमोद आनंद मेनन हे काम पाहतील तर सुनिल भोवड संयुक्त चिटणीस असतील.

या संस्थेचे खजिनदार म्हणून धनिश  बंगेरा तर सह खजिनदार राजकुमार गुप्ता काम पाहणार आहेत. सुरेशकुमार नारायण समेळ तांत्रिक सल्लागार असणार आहेत तर कार्यकारी समितीवर प्रयांश छेडा, शशिकांत शेट्टी, राजश्री संजय कोळी व प्रसाद शिंदे सदस्य असतील.

 

Congratulations and Best Wishes for 2026–2030! 🎊🥋🏆

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button