आंतरराष्ट्रीयआरोग्यक्रीडागुन्हेजीवनशैलीटॉप न्यूजतंत्रज्ञानताज्या बातम्याधर्म / ज्योतिषमनोरंजनराजकारणराष्ट्रीयव्यापारशिक्षण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ वेबसाईट;
राज ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करण्याचे आवाहन

गुढीपाडव्याला राज ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राच्या विकासासाठी ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ हे संकेतस्थळ अर्पण करण्यात आले. महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्यांसाठी विकास आराखडा बनवणे, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकांकडून सूचना मागवणे तसेच राज्याला त्याचे गतवैभव पुन्हा मिळवून देणे असे उद्देश या संकेतस्थळ निर्मितीमागे असल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी भाषणात सांगितले.
*रामनवमी निमित्त नवी मुंबईकरांना घडणार महाराष्ट्राचं ‘लोककला दर्शन’*
संपूर्ण भारतात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटात साजरा केला जातो. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. सेक्टर १९, भूमिकोलोसा चौक, ऐरोली, नवी मुंबई येथील श्रीराम संकल्प प्रतिष्ठानतर्फे दर वर्षी रामनवमीचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविण्यात येतात. याही वर्षी २६ मार्च रोजी त्यांनी मोठ्या थाटात रामनवमीचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात मुंबई विश्व लोककला मंचतर्फे ‘लोककला दर्शन’ हा महाराष्ट्रातील लोककलांचा सांगीतिक कलाविष्कार असणारा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. अर्थात यानिमित्ताने नवी मुंबईकरांना महाराष्ट्राच्या विविध संस्कृतीचं, लोककलांचं दर्शन घडणार आहे. शिवाय लोककला दर्शन कार्यक्रम प्रभू श्रीराम यांच्या पराक्रमाची कथा सादर होणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम नवी मुंबईकरांसाठी रामनवमीच्या निमित्ताने विशेष आकर्षण ठरणार आहे. म्हणून समस्त नवी मुंबईकरांनी आवर्जून या भव्य सोहळ्याला उपस्थित राहून आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि प्रभू श्रीराम यांच्या पराक्रमांचा आनंद घेण्यासाठी जरूर यावे.
सध्या महाराष्ट्रात लोककला सादरीकरणाला आणि लोककलावंतांसाठी सुवर्ण काळ आला आहे. संपूर्ण महाराष्ट्र विविध ठिकाणी भव्य दिव्य पद्धतीने लोककलांचे सादरीकरण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अशातच रामनवमी निमित्त सहसा भजनाचा किंवा नाटकाचा कार्यक्रम आयोजित केला जातो परंतू ऐरोली नवी मुंबईच्या श्रीराम संकल्प प्रतिष्ठानने महाराष्ट्राची लोकसंस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या ‘लोककला दर्शन’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्यामुळे सर्व प्रभू श्रीराम भक्तांनी आणि रसिक मायबाप प्रेक्षकांनी जरूर या कार्यक्रमाला हजेरी लावून आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं, लोककलांचं आणि प्रभू श्रीरामाच्या चरित्राचं दर्शन अनुभवा.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ६ वाहनांचा भीषण अपघात! प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर ‘भूमिपुत्र फाऊंडेशन’चा संताप 🚨
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील (NH-48) ससुपाडा (वसई) येथे सुरू असलेल्या अपूर्ण काँक्रिटीकरणाच्या कामामुळे काल ६ वाहनांचा भीषण साखळी अपघात झाला. या दुर्घटनेत दोन कार, एक बस, एक कंटेनर, एक टेम्पो आणि एका पिकअप व्हॅनचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; टेम्पोमध्ये अडकलेल्या चालकाला स्थानिक नागरिक आणि वसई वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने सुखरूप बाहेर काढण्यात आले.
या गंभीर समस्येवर ‘भूमिपुत्र फाऊंडेशन’चे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. महामार्गावरील अपूर्ण कामे आणि खराब सर्व्हिस रोड्समुळे हा परिसर अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’ बनला असून, निष्पाप प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. वारंवार अपघात होऊनही प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत आहे. “NHAI अजून किती मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे?” असा संतप्त सवाल सुशांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ६ वाहनांचा भीषण अपघात! प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर ‘भूमिपुत्र फाऊंडेशन’चा संताप 🚨
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील (NH-48) ससुपाडा (वसई) येथे सुरू असलेल्या अपूर्ण काँक्रिटीकरणाच्या कामामुळे काल ६ वाहनांचा भीषण साखळी अपघात झाला. या दुर्घटनेत दोन कार, एक बस, एक कंटेनर, एक टेम्पो आणि एका पिकअप व्हॅनचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; टेम्पोमध्ये अडकलेल्या चालकाला स्थानिक नागरिक आणि वसई वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने सुखरूप बाहेर काढण्यात आले.
या गंभीर समस्येवर ‘भूमिपुत्र फाऊंडेशन’चे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. महामार्गावरील अपूर्ण कामे आणि खराब सर्व्हिस रोड्समुळे हा परिसर अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’ बनला असून, निष्पाप प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. वारंवार अपघात होऊनही प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत आहे. “NHAI अजून किती मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे?” असा संतप्त सवाल सुशांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा कारवाईचा इशारा…. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांवर, आमदारांवर इतकेच काय तर खासदारांवरही आरोप होताना दिसतात. मात्र या प्रकरणांमध्ये अनेकदा पुढे काही घडत नाही अशी तक्रार सर्वसामान्यांकडून आणि तक्रारदार एकमेकांचे राजकीय विरोधक असल्यावर होते. मात्र महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या एका आमदाराविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून केंद्रीय नेतृत्वाकडून आर्थिक घोटाळ्यांसंदर्भातील कठोर भूमिका या प्रकरणामुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे. मात्र हा आमदार कोण आणि त्याच्यावर काय आरोप झालेत ते पाहूयात…
शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्याचा आरोप
ज्या आमदाराविरोधात थेट केंद्राकडून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत तो आमदार मुंबईलाच लागून असलेल्या मिरा-भाईंदरमधला आहे. मिरा-भाईंदरमधील भाजपचे आमदार नरेंद्र मेहता हे पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या आदेशामुळे अडचणीत आलेत. आगामी काळात मेहतांच्या अडचणीत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. नरेंद्र मेहता यांच्यावर भूखंड लाटण्याचा आणि कोट्यवधी रुपयांची स्टॅम्प ड्युटी लाटल्याचा आरोप होत आहे. मेहता यांनी सरकारची जवळपास 400 ते 500 कोटींहून अधिक स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा आरोप होत आहे. अनेक आदिवासी आणि इतर समाजाच्या लोकांच्या जमीन भाजपाच्या या आमदाराने हडपल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
महसूल मंत्र्यांकडूनच ‘भूमाफिया’ असा उल्लेख
याप्रकरणी पंतप्रधान मोदींकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. आता खुद्द पंतप्रधान कार्यालयाने या तक्रारींची दखल घेऊन थेट मुख्यमंत्री कार्यालयाला कारवाईचे आदेश मागील आठवड्यात दिले आहेत. एवढेच नाही तर काही महिन्यांपूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रावर नरेंद्र मेहता यांचा ‘भूमाफिया’ असा उल्लेख आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. त्यामुळेच आता आगामी काळात नरेंद्र मेहतांच्या अडचणी अधिक वाढण्याची दाट शक्यता असून त्यांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.
मेहतांचं म्हणणं काय?
महेता यांनी आपल्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, असं म्हटलं आहे. तसेच आपण कोणत्याही जमिनीचा गैरव्यवहार केलेला नाही, असंही मेहता यांनी म्हटलं आहे.
मेहतांवर कोणकोणते आरोप?
मेहता हे सेव्हन इलेव्हन कंपनीचे मालक आहेत. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी जमिनींचे अनेक गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत. रिअल इस्टेट व्यवसायी जय शुक्ला यांनी मेहतांनी फ्लॅट विक्रीच्या नावाखाली अडीच लाखांची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी मेहतांवर गुन्हा दाखल आहे. मेहता यांनी मिरारोड येथील कांदळवन क्षेत्रात ‘सेव्हन इलेव्हन क्लब’ बांधला असून तो नियमांचं उल्लंघन करुन बांधल्याची याचिका 2019 मध्ये सामाजिक कार्यकर्ता धीरज परब यांनी केल्यानंतर मुंबई हायकोर्टाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.
मेहता यांनी सेव्हन इलेव्हन कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या जमिनी नोंदणीकृत न करता नाममात्र रकमेवर विकत घेतल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. कमी मुद्रांक शुल्क भरून मेहतांनी बांधकाम करुन शासनाचा महसूल बुडवण्याबरोबरच शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या शिवाय मेहतांवर अपना घर प्रोजेक्टमध्ये 70कोटींचा वाळू रॉयल्टी घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच मेट्रो उड्डाणपूल घोटाळ्यात 210कोटींच्या प्रोजेक्ट 620 कोटींचा झाल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणात सध्या चौकशी सुरु आहे.
📰 शिवस्वराज्य न्यूज | प्रतिनिधी
🚇 मेट्रोमध्ये मराठी तरुणांना रोजगार द्या – मराठी एकीकरण समितीची मागणी
मुंबई आणि उपनगरांमध्ये मेट्रो प्रकल्पाचे जाळे वेगाने विस्तारत असताना, या प्रकल्पांमध्ये मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. मराठी एकीकरण समितीने ही भूमिका स्पष्ट करत प्रशासनाला लवकर निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.
समितीच्या मते, मेट्रो प्रकल्पांतील तांत्रिक आणि बिगर-तांत्रिक पदांवर स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे. सध्या मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज असूनही महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सांगितले की: 👉 मेट्रो प्रकल्पांसाठी स्पष्ट धोरण तयार करून स्थानिक युवकांना प्राधान्य द्यावे
👉 आतापर्यंत किती मराठी युवकांना रोजगार मिळाला याची आकडेवारी जाहीर करावी
👉 खाजगी कंत्राटदारांची माहिती सार्वजनिक करावी
तसेच, मेट्रो स्थानकांवरील फलक, सूचना आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर बंधनकारक करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
समितीने लवकरच MMRDA (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले.
📢 शिवस्वराज्य न्यूजचा सवाल:
👉 मुंबईच्या विकासात स्थानिकांचा हक्क कितपत जपला जातोय?