hi Hindi en English mr Marathi ur Urdu
आंतरराष्ट्रीयगुन्हेजीवनशैलीटॉप न्यूजताज्या बातम्याधर्म / ज्योतिषराजकारणराष्ट्रीय

राममंदिर चोरी विरोधात उद्धव ठाकरे यांचा एल्गार

दादर येथील हनुमान मंदीरात रामरक्षा पठण करून आंदोलनाला सुरुवात

अयोध्येतील राममंदिर देणगी चोरी विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, दादर येथील हनुमान मंदिरात रविवार ५ जुलै रोजी रामरक्षा पठण करून आंदोलनास मुबईपासून सुरुवात केली जाणार आहे. अयोध्येतील राममंदिराला श्रद्धाळू भाविकांनी दिलेल्या देणगीवर राजरोस डल्ला मारला गेला असून, हा पैसा विरोधी पक्षांचे आमदार व खासदार फोडण्यासाठी वापरला गेल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

ज्या लोकांना राममंदिर चोरी सहन होत नाही त्यांनी या रामरक्षा पठणात सहभागी व्हावे असे आवाहन करताना उद्धव ठाकरे यांनी सवाल विचारला आहे की विरोधी पक्ष फोडताना ऑपरेशन असे नाव देता आता राममंदिर ऑपरेशन कधी करणार ?

राममंदिर व हिंदूंच्या मतावर भाजप सत्तेत आला मात्र आता हिंदू भाजपला माफ करणार नाही. चोऱ्या करण्यासाठी राममंदिर बांधले का ? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे ?

संघाची नाराजी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या भाजपच्या पालक संघटनेनेही राममंदिर देणगी चोरीविरोधात काल नाराजी व्यक्त केली. संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी राममंदिर  देणगी गैरव्यवहारामुळे समाजाच्या व रामभक्तांच्या  श्रद्धेवर आघात झाला असून या घटनेमुळे संघ अतिशय व्यथित झाला असल्याचे म्हटले आहे. मात्र श्री राममंदिर तीर्थक्षेत्र न्यास व त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर टीका करणे त्यांनी टाळले.

दरम्यान या चोरी विरोधात आठ जणांवर गुन्हा दाखल झाला असून राममंदिर न्यासाच्या गेल्या पाच वर्षांतील आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई प्रतिनिधी……दिनांक ४ जुलै २०२६, शनिवार

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button