hi Hindi en English mr Marathi ur Urdu
आंतरराष्ट्रीयजीवनशैलीटॉप न्यूजताज्या बातम्याराष्ट्रीय

लोकसत्ता पूर्णब्रह्म पाककृती स्पर्धा पुरस्कारप्राप्त पाककृती

तसेच काही लक्षवेधक व नावीन्यपूर्ण पाककृती

 

मुंबई व ठाणे येथे नुकतीच लोकसत्ता आयोजित पूर्णब्रह्म पाककृती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत बोरिवली येथे भाग घेतलेल्या स्पर्धकांची नावे, पाककृती व काही लक्षवेधक आणि नावीन्यपूर्ण पाककृती :

विभाग : घरची पार्टी

प्रथम क्रमांक  : स्वाती श्रीवर्धनकर   द्वितीय क्रमांक : शुभदा बने  तृतीय क्रमांक : सिद्धेश पाताडे    उत्तेजनार्थ :  वंदना म्हात्रे, सोनाली मेस्त्री 

विभाग : पापड वापरून केलेले पदार्थ 

प्रथम क्रमांक : वैशाली सुतार  द्वितीय क्रमांक : कविता येवले  तृतीय क्रमांक : शकुंतला शेळके          उत्तेजनार्थ  : अंजली असवडेकर, उमा काटदरे, मंदाकिनी म्हात्रे, कल्पना विसपुते, कृपाली सावे 

विभाग : स्टार्टर                                             

प्रथम क्रमांक : वैशाली पुजारी   द्वितीय क्रमांक : आदिश आपटे  तृतीय क्रमांक : कल्पना कयाल          उत्तेजनार्थ : सुवर्णा गावकर, उज्वला गवळी, कांचना ठाकूर, जान्हवी गोठणकर व वर्षा नलावडे

काही लक्षवेधक व नावीन्यपूर्ण पाककृती :

डॉ. हेमंत जोशी : सातू व खजुराचे पौष्टिक लाडू

संदीप बाळकृष्ण कदम :  स्टार्टर : पोटॅटो क्रिस्प

ज्योति मनोहर जोगळेकर : पापड : पापडाचे लाडू

अनुजा विलास पवार : पार्टी : कोबीच्या वड्य

डॉ हेमंत जोशी यांची सातू व खजुराचे लाडू ही पाककृती :

साहित्य : १०० ग्रॅम सातूचे पीठ, १०० ग्रॅम खजूर, १ चमचा वेलची पावडर, १ चमचा जायफळ पावडर, २ चमचे खसखस व अर्धा वाटी तूप.

कृती :

१ १०० ग्रॅम सातूचे पीठ व १०० ग्रॅम खजूर यात जायफळ व वेलची पावडर टाका व हाताने एकत्र करा.

२  आता अर्धा वाटी तूप गरम करून मिश्रणात हे तूप टाकून चांगले मळून घ्या.

३ चांगले एकजीव झाल्यावर त्याचे मध्यम आकाराचे लाडू वळून घ्या.

४ एका परातीत खसखस थोडी पसरून घ्या व लाडवांना सर्व बाजूने खसखस लागेल असे पहा.

हे लाडू अतिशय पौष्टिक असल्याने कृश मुलांना दिल्यास मुले धष्टपुष्ट होतात.

 

संदीप कदम यांची पोटॅटो क्रीस्प ही पाककृती:

साहित्य : एक मोठा बटाटा, कॉर्नफ्लॉवर, मैदा, आले लसूण पेस्ट, लाल तिखट व चवीनुसार मीठ व चाट मसाला.

कृती :

१ प्रथम एक मोठा बटाटा घेऊन धुऊन घ्यावा व त्याची साले काढून घ्यावी.

२ काढलेली साले पुन्हा धुऊन मिठाच्या पाण्यात ठेवावी

३ एका भांड्यात कॉर्नफ्लॉवर, मैदा, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ घेऊन व पाणी घालून एकत्र करावे.

४ त्या मिश्रणात भिजत ठेवलेली बटाट्याची साले घालावीत. मिश्रण सालीना सर्व बाजूस व्यवस्थित लावावे.

५. आता एका भांड्यात तेल गरम करून बटाट्याची साले तळून काढावी. तेल मध्यम आचेवर गरम असावे नाहीतर कापे जळण्याची शक्यता असते.

६ कुरकुरीत तळल्यावर वरून चाट मसाला टाकून टोमॅटो केचपसोबत सर्व्ह करावे.

ही कापे अगदी फ्राय मांदेली प्रमाणे दिसतात व तशीच चवीला असतात

ज्योति मनोहर जोगळेकर यांची पापडाचे लाडू ही पाककृती खालीलप्रमाणे :

साहित्य : उडदाचे सहा पापड, अर्धा वाटी पिठी साखर, २ चमचे तूप, २ चमचे भाजलेले सुके खोबरे, २ चमचे बारीक चिरलेले बदाम व पिस्ता, अर्धा चमचा वेलची पूड.

कृती

१  पापड तव्यावर खरपूस भाजा पण करपू देऊ नका. हाताने या पापडांचा चुरा करा.

२ एका परातीत पापडांचा चुरा व तूप सोडून इतर सर्व पदार्थ घेऊन हे कोरडे मिश्रण एकजीव करा.

३ आता हाताला थोडे कोमट तूप लावून या कोरड्या मिश्रणाचे तीळाच्या लाडवाएवढे छोटे लाडू बनवा व १० मिनिटे बाहेर ठेवा म्हणजे लाडू घट्ट होतील. हवाबंद डब्यात लाडू ठेवल्यास बरेच दिवस टिकतात.

तूप नसल्यास दूध व दुधाची पावडर वापरली तरी चालेल.

 

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button