hi Hindi en English mr Marathi ur Urdu
ताज्या बातम्या

केंद्र सरकार देशातील प्रत्येक पोलीस स्थानकात सीसी टीव्ही बसवण्याच्या तयारीत

पोलीस कोठडी मृत्यूत वाढ झाल्याने हा निर्णय

Blasting news by Ajit Patil

वाढत्या पोलीस कोठडी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार लवकरच देशातील सर्व पोलीस स्थानकात सी सी टीव्ही बसवण्याच्या तयारीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.
तामिळनाडू राज्यातील सांताकुलम येथील पोलिस कोठडीत जून २०२० मध्ये झालेल्या अमानुष मारहाणीत पिता पुत्राचा मृत्यू झाला. या गुन्ह्याबद्दल ९ पोलीस अधिकाऱ्यांना मदुराई विशेष न्यायालयाने दुहेरी फाशीची कठोर शिक्षा ठोठावली. या घटनेची पार्श्वभूमी या निर्णयाला असल्याचे कळते.
आपल्या देशात गेल्या वर्षभरात १७० जणांचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला. देशातील सरासरी पोलीस कोठडीतील मृत्यूचे प्रमाण वर्षाला १५० ते १६० आहे.
राज्यांचा विचार करता उत्तर प्रदेशात सर्वात जास्त कोठडी मृत्यू होतात तर त्या खालोखाल तामिळनाडू व महाराष्ट्राचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक लागतो.

बहुतांश मृत्यू कोठडीतील पोलिसांच्या अमानुष छळ यामुळे किंवा कैद्याच्या आजाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे होतात. कैद्याचा कोठडीत मृत्यू झाल्यास पोलीस कधीकधी आत्महत्या किंवा आजाराने मृत्यू झाल्याचा बनाव करतात.
देशात सर्वात पहिली गाजलेले पोलीस कोठडी मृत्यूचे प्रकरण पी. राजन या विद्यार्थ्याचे होते. १९७६ साली आणीबाणी विरोधात आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्याला केरळ पोलिसांनी अटक केली. नंतर त्याचा कोठडीत मृत्यू झाला. यामुळे लोक एवढे संतप्त झाले की केरळचे तत्कालीन काँग्रेस मुख्यमंत्री के. करुणाकरन यांना पायउतार व्हावे लागले.
ख्वाजा युनूस या मुंबई घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीचा मृत्यू ही वादग्रस्त ठरला. पोलीस छळामुळे त्याचा कोठडीत मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता.

याशिवाय केरळम राज्यातील के राजकुमार व उदयकुमार या दोन संशयितांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी पोलीसांना कैद व निलंबनाच्या शिक्षा झाल्या आहेत.

भारतीय पोलीस स्थानकातील अपुऱ्या सुविधा, रुग्णालये व रुग्णवाहिका यांची अपुरी संख्या, पोलीस कर्मचारी यांची कमतरता ही सुद्धा पोलीस कोठडीतील मृत्यूमागील काही कारणे आहेत असे या विषयातील एक्स्पर्ट लोकांचे मत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button