महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ नागरिकांना बोधगया दर्शनाची संधी
'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने'तंर्गत मुंबईवासियांसाठी उपक्रम

विशेष संवाददाता शिवस्वराज्य न्यूज
महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’तंर्गत मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा येथील रहिवासी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बोधगया दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
ही यात्रा ३ ते ६ जून २०२६ या कालावधीत आयोजित केली जाणार असून यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मुंबई शहर रहिवासी ज्येष्ठ नागरिकांनी २० मे २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर व मुंबई उपनगर रहिवासी ज्येष्ठ नागरिकांनी १५ मे २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांच्याशी संपर्क साधून अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्जासोबत आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे जोडावीत. तसेच अर्जदार व्यक्तीची वयाची साठ वर्षे पूर्ण झाली असावीत. अर्जदार शिधापत्रिका (रेशन कार्ड) धारक असावा व वार्षिक उत्पन्न २.५० लाखाच्या मर्यादेत असावे या मुख्य अटी आहेत.