hi Hindi en English mr Marathi ur Urdu
आंतरराष्ट्रीयआरोग्यक्रीडागुन्हेजीवनशैलीटॉप न्यूजतंत्रज्ञानताज्या बातम्याधर्म / ज्योतिषमनोरंजनराजकारणराष्ट्रीयव्यापारशिक्षण

पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रात्री दहानंतर खाद्यपदार्थ विक्री बंदचा निर्णय

खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या टपऱ्या व फेरीवाल्यांवर कारवाई करणार

अजित पाटील

‘पुणे तेथे गुन्हे, अशी पुण्याची नवी ओळख बनत असल्याने पुणे पोलिसांनी वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. 

पुणे शहरात १४ दिवस जमावबंदी निर्णयासह आता रात्री दहानंतर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या गाड्या, फेरीवाले, पानटपऱ्या व चहाची दुकाने बंद राहणार आहेत. यासोबत हॉटेल व बार यांना नियमानुसार रात्री दीड पर्यंत विक्री करता येईल पण त्यानंतर आस्थापने चालू राहिली तर मात्र कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पुणे शहर आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. रात्री गस्त व पोलीस बंदोबस्त वाढविण्याच्या सूचना पोलीसांना दिल्या आहेत. रात्री दहानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांची दादागिरी वाढते. खाद्यपदार्थाच्या गाडीवर वाद होतात व त्यातून गंभीर गुन्हे घडतात हे ध्यानात घेऊन पुणे पोलिसांनी आता हे निर्णय घेतले आहेत.

​मात्र पुण्यात रात्री १० नंतर दुकाने आणि व्यवसाय बंद ठेवण्याच्या सरकारच्या प्रस्तावित निर्णयामुळे व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आधीच वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे कडाडलेले दर आणि मंदावलेल्या बाजारपेठेशी संघर्ष करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडणारा हा निर्णय असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
मुख्य मुद्दे व्यापाऱ्यांचे थेट सवाल
​रात्रीची अर्थव्यवस्था धोक्यात: आयटी शहर असलेल्या पुण्यात अनेक नागरिक रात्री ८ नंतरच खरेदी आणि हॉटेलिंगसाठी बाहेर पडतात. १० वाजता दुकान बंद केल्यास व्यवसाय करायचा कधी?
​लघुउद्योजकांचे मरण: फूड स्टॉल, मेडिकल, किराणा, चहा सेंटर आणि लहान हॉटेल्सवर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल.
​चोरीछुपे निर्णय अमान्य: जनतेला आणि व्यापारी संघटनांना विश्वासात न घेता लादलेले नियम सहन केले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

जनता विचारतेय: “नेमके साध्य काय करायचे आहे?”
​”महागाईने आधीच कंबरडे मोडले आहे, रोजगार कमी झाले आहेत. अशात व्यवसायाची वेळ कमी करून सरकारला नेमके काय साध्य करायचे आहे? कायदा-सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम आहे, त्यासाठी व्यापाऱ्यांचे पोट मारणे कितपत योग्य?”

पुढे काय? सरकार माघार घेणार का?
​पुण्यातील विविध भागात व्यापारी संघटनांच्या तातडीच्या बैठका सुरू झाल्या असून, सरकारला निवेदने देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. “जर सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही, तर पुण्यातील बाजारपेठा बेमुदत बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा थेट इशारा व्यापारी महासंघाने दिला आहे.
​आता चेंडू सरकारच्या कोर्टात असून, वाढता लोकक्षोभ पाहता सरकार या ‘तुघलकी’ निर्णयावरून माघार घेणार की आपल्या निर्णयावर ठाम राहणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button