hi Hindi en English mr Marathi ur Urdu
आंतरराष्ट्रीयआरोग्यजीवनशैलीटॉप न्यूजताज्या बातम्याराष्ट्रीयशिक्षण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉ. महेंद्र घागरे यांचे पुण्यात व्याख्यान

पर्यावरण विषयांवर विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यावरण तज्ञ डॉ. महेंद्र घागरे ५ जून २०२६ रोजी पुणे येथील ज्ञानगंगा महाविद्यालयात व्याख्यान देणार आहेत. शुक्रवार ५ जूनला सकाळी ११ वाजता या व्याख्यानाला सुरुवात होईल. पुण्याच्या सिंहगड रोडवरील ज्ञानगंगा ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना डॉ. महेंद्र घागरे मार्गदर्शन करणार आहेत. हरित मित्र परिवाराचे संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक या नात्याने डॉ. महेंद्र घागरे यांनी पर्यावरण संवर्धन व संरक्षण यासाठी अनेक उपक्रम राबवले असून अनेक युवा पर्यावरण कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button