hi Hindi en English mr Marathi ur Urdu
आंतरराष्ट्रीयआरोग्यक्रीडागुन्हेताज्या बातम्या

उद्या फलटण येथे भरणार प्रसिध्द ‘घोडयाची यात्रा’

सातारा जिल्ह्यातील एक महत्वपूर्ण उत्सव

सातारा जिल्हयातील फलटण तालुक्यातील ‘घोडयाची यात्रा’ हा एक फार मोठा उत्सव असतो. हे तीर्थक्षेत्र महानुभाव पंथाची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. दर वर्षी एप्रिल महिन्यात येथे घोडयाची यात्रा आयोजित केली जाते. यंदा ७ एप्रिल रोजी ही यात्रा भरत आहे. यात्रेच्या मुख्य दिवशी आबासाहेब मंदिर येथून घोडे, पालखी व छबिना प्रदक्षिणेला निघतात. यावेळी गुलालाची जबर उधळण केली जाते. सर्व परिसर गुलाबी रंगाने न्हाऊन निघतो. नंतर रात्री ८ पर्यंत पालखीसहित घोडे मंदिरात परत येतात.

या घोडयाच्या यात्रेमागची आख्यायिका अशी की काही भाविक पितळी घोडी घेऊन जेजुरीला जात असताना काही वर्षापूर्वी एका भाविकाने येथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी घोडा उचलण्याचा प्रयत्न केला पण घोडा काही उचलला गेला नाही. त्यावेळी फलटणच्या लोकांनी भाविकाला विनंती केली की हा घोडा देवाला आवडला असल्याने तो येथेच देवाच्या स्वाधीन करावा. त्या भाविकाने लोकांची विनंती मान्य केली. त्यादिवसापासून ‘घोडयाची यात्रा’ सुरु झाली असे म्हणतात. या यात्रेसाठी केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक व तेलंगणा येथून भाविक येतात.

(विठठल चव्हाण सातारा जिल्हा प्रतिनिधी)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button