दादर येथे कोकण प्रॉपर्टी व कोकण बाजारपेठ पाहण्यासाठी लोकांची गर्दी
कोकणात स्थावर मालमत्तेत गुंतवणुकीची संधी

क्रेडाई आयोजित कोकण प्रॉपर्टी महोत्सव तसेच कोकण साम्राज्य अंतर्गत कोकण विकास युवा मंच आयोजित कोकण बाजारपेठ पाहण्यासाठी आठवड्याच्या शेवटी लोकांनी गर्दी केली.
दादर शिवाजी पार्क येथील क्रीडा मैदानात भरलेल्या क्रेडाई आयोजित कोकण प्रॉपर्टी महोत्सवात कुडाळ, कणकवली, मालवण, वेंगुर्ला, रत्नागिरी व गणपतीपुळे येथील अनेक स्थावर मालमत्ता विकासकांनी भाग घेतला होता.
विविध प्लॉट फ्लॅट्स व बंगल्याचे ऑप्शन्स येथे लोकांना पाहायला मिळाले. समुद्रकिनारी असलेले फ्लॅट्स तसेच गणपतीपुळे सारख्या धार्मिक ठिकाणी असलेले प्लॉट व बंगले यांची तपशीलवार माहिती येथे मिळाली.
कोकण विकास युवा मंच तर्फे बाजूलाच कोकण बाजारपेठ आयोजित करण्यात आली होती त्यात विविध प्रकारच्या खास कोकणमेड वस्तू व खाद्यपदार्थ पाहायला व चाखायला मिळाले. आमसूल, काजू, आंबे, फणस यांच्यापासून बनवलेले पदार्थ होतेच शिवाय गोव्याचे प्रसिद्ध पदार्थही होते. याशिवाय आधुनिक छोटेखानी स्टील पासून बनवलेले विळे, सुकविलेली फणसाची भाजी, कच्ची कैरी वडी, सुगंधित अत्तरे, विविध प्रकारचे मध, घरगुती साबण, कपडे, दागिने, हाय करक्युमैन हळद, भरड धान्याचे पदार्थ, या मुळे प्रदर्शन उजवे ठरले
यासोबत पारंपरिक दशावतार व संगीत कार्यक्रमामुळे कोकण महोत्सवात कोकणी मातीचा सुगंध ही जाणवला.
शिवस्वराज्य न्यूज साठी रवींद्र गावडे, प्रमोद खानविलकर