आंतरराष्ट्रीयआरोग्यक्रीडागुन्हेजीवनशैलीटॉप न्यूजतंत्रज्ञानताज्या बातम्याधर्म / ज्योतिषमनोरंजनराजकारणराष्ट्रीयव्यापारशिक्षण
बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीच्या लढ्याला यश
९००० बेस्ट सेवानिवृत्त कामगारांना मिळाला कोव्हिड काळातील भत्ता

गेली सहा वर्षे रखडलेला कोव्हिड कालीन भत्ता अखेर बेस्टच्या सेवानिवृत्त कामगारांना मिळाला आहे.बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीच्या गेली सहा वर्षे चाललेल्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे.
१५ एप्रिल २०२६ रोजी दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात भाई पानवडीकर यांच्या अध्यक्षतेखाली बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीची इशारा सभा झाली. यावेळी कोविड काळातील भत्ता न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात आला. सरकारने व बेस्ट प्रशासनाने याची तत्काळ दखल घेवून कोविड भत्ता १७ एप्रिलला संबंधित कामगारांच्या खात्यात जमा केला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ९०७७ कामगारांना २९ कोटी २२ लाख रुपये भत्ता देण्यात आला आहे.