hi Hindi en English mr Marathi ur Urdu
आंतरराष्ट्रीयआरोग्यक्रीडागुन्हेजीवनशैलीटॉप न्यूजतंत्रज्ञानताज्या बातम्याधर्म / ज्योतिषमनोरंजनराजकारणराष्ट्रीयव्यापारशिक्षण

दिव्यांग बांधवांनी ‘दिव्यांग सहायक पोर्टल मध्ये त्वरित नोंदणी करावी

शिव स्वराज्य न्यूज चे आवाहन

 

महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवांनी शक्य तेवढ्या लवकर महाराष्ट्र सरकारने स्थापित केलेल्या दिव्यांग सहायक पोर्टल मध्ये नोंद करावी असे आवाहन शिव स्वराज्य न्यूजचे संस्थापक अजित हरेश पाटील यांनी केले आहे

अनेक दिव्यांग बांधवांनी अजून या पोर्टलवर नोंदणी केली नाही. मात्र ज्या दिव्यांग बांधवांकडे केंद्र सरकारचे UDID म्हणजे युनिक डिसेबीलिटी आयडेंटिफिकेशन कार्ड असेल त्यांनाच या पोर्टलवर नोंदणी करता येईल.

यासाठी प्रथम पोर्टलवर जाऊन आपला UDID क्रमांक टाकावा जर तुमचा मोबाईल क्रमांक UDID मध्ये नोंदणीकृत असेल तरच तुम्हाला OTP येईल. जर मोबाईल नोंदणीकृत नसेल तर UDID च्या पोर्टलवर जाऊन आपला मोबाईल व ईमेल अपडेट करावा.

OTP  प्राप्त झाल्यावर तो पोर्टलमध्ये टाकल्यावर तुमची पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया सुरू होईल. त्यात प्रथम तुमचा आधार क्रमांक पॅनकार्ड क्रमांक आधारवरचा पत्ता वडिलांचे पूर्ण नाव आईचे पूर्ण नाव जात वार्षिक उत्पन्न पालकांचे वार्षिक उत्पन्न शिक्षण बँक खाते तपशील टाकल्यावर व सर्व माहिती submit केल्यावर तुमची  नोंदणी प्रक्रिया  पूर्ण होईल.

त्यानंतर तुमच्या मोबाईल ने log in करून कागदपत्रे upload करावी. सुमारे १४ प्रकारची कागदपत्रे submit करायची असतात. सर्व कागदपत्रे आवश्यक नसतात उदा. जर तुम्ही विवाहित नसाल तर विवाह प्रमाणपत्र देण्याची गरज नाही मात्र काही कागदपत्रे देणे गरजेचे आहे जे भविष्यात तुम्हाला फायद्याचे होईल सर्व कागदपत्रांचा तपशील खालीलप्रमाणे

१ आधार ओळखपत्र २ बँक पासबुक ३ जन्म दाखला ४ जात प्रमाणपत्र ५ सध्याच्या पत्त्याचा पुरावा (आधार चालेल) ६ महाराष्ट्राचे कायम रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र (Domicile Certificate)  ७ दिव्यांग वैश्विक प्रमाणपत्र (UDID).  ८ पालकांचे प्रमाणपत्र ९ सर्वोच्च शैक्षणिक प्रमाणपत्र १० विवाह दाखला ११ उत्पन्न प्रमाणपत्र १२ कायम पत्ता पुरावा १३ दहावी प्रमाणपत्र १४ बारावी प्रमाणपत्र.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button