पंडीत शंकर शास्त्री यांची खळबळजनक राजकीय भविष्यवाणी
प. बंगाल मध्ये भाजप सत्तेवर अन्य राज्यात अपेक्षित निकाल

प्रसिद्ध राजकीय ज्योतिषी कालिना मुंबई येथील पंडीत शंकर शास्त्री यांनी खळबळजनक राजकीय भविष्यवाणी केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला ढासळणार असून भाजप सत्तेवर येणार आहे. इतर तीन राज्ये म्हणजे तामिळनाडू, केरळ व आसाममध्ये अपेक्षित निकाल लागणार असून तिथे सध्याचा सत्ताधारी पक्ष थोड्याफार फरकाने सत्ता मिळवेल असे भाकीत त्यांनी केले आहे
सर्वात धक्कादायक निकाल पश्चिम बंगालमध्ये लागेल. भाजप १५० ते १८० जागा मिळवून तृणमूल काँग्रेसला भुईसपाट करेल व १५ वर्षे टिकलेला ममतांचा बंगालचा किल्ला उद्ध्वस्त करेल. तृणमूल काँग्रेसला ५० ते ६० जागांवर समाधान मानावे लागेल. काँग्रेस व डावे पक्ष दोन आकडी संख्या गाठण्यात अपयशी ठरतील.
इतर राज्यात अपेक्षित निकाल लागतील. स्टालिन यांचा द्रमुक पक्ष १४० ते १५० जागा मिळवू शकेल. अण्णा द्रमुक पक्षाला थळपती विजय याने स्थापन केलेल्या तमिळगा वेत्री कळझंम पक्षांमुळे मोठे नुकसान सोसावे लागेल त्यांना ३० ते ४० जागांचे नुकसान होवू शकते. भाजप व काँग्रेसची दुहेरी आकडा गाठताना दमछाक होणार आहे.
आसाममध्ये हेमंत बिस्वासर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजप अधिक मजबूत होईल व एनडीए आघाडी ८० पेक्षा अधिक जागा मिळवेल. काँग्रेसला १५ च्या आसपास जागा मिळवू शकेल इतर पक्षांना २५ ते ३० जागा मिळतील.
केरळमध्ये यंदा ११ पक्ष व अपक्षांची डावी लोकशाही आघाडी कशीबशी सत्ता टिकवू शकेल सीपीआय व सीपीएम या डाव्या पक्षांच्या जागा कमी होतील व काँग्रेसच्या जागा अनपेक्षित वाढतील पण सत्ता मिळवणे काँग्रेससाठी फार कठीण जाईल. काही चमत्कार घडला तरच काँग्रेस सत्तेवर येईल. भाजप यावेळी खाते उघडण्याची शक्यता आहे.
शंकर शास्त्री यांनी यापूर्वी अनेक निवडणुकांचे राजकीय अंदाज वर्तवले आहेत जे खरे ठरले आहेत. उदा. काँग्रेसचे २०१४ च्या निवडणुकीतील पतन, नरेंद्र मोदी यांचा सलग तीन निवडणुकीत विजय, उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांना अचानक मुख्यमंत्री पदाचा लाभ, उद्धव ठाकरे यांचे सरकार पडणे, देवेंद्र फडणवीस यांचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणे इत्यादी भविष्यवाणी सत्य ठरल्या आहेत.
या सोबत गेल्या पाच वर्षांतील विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा अचूक अंदाज त्यांनी वर्तवला आहे. त्यात पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, केरळ, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश नवी दिल्ली इत्यादी राज्यांचा समावेश आहे.
अजित पाटील शिव स्वराज्य न्यूज