hi Hindi en English mr Marathi ur Urdu
आंतरराष्ट्रीयआरोग्यक्रीडागुन्हेजीवनशैलीटॉप न्यूजतंत्रज्ञानताज्या बातम्याधर्म / ज्योतिषमनोरंजनराजकारणराष्ट्रीयव्यापारशिक्षण

‘जनादेश टीव्ही न्यूज’ च्या १८ व्या वर्धापन दिनी मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव

ठाणे येथे संपन्न झाला दिमाखदार सोहळा


जनादेश टीव्ही न्यूज या वृत्तवाहिनीच्या १८ व्या वर्धापन दिनी ठाणे येथे गडकरी रंगायतन सभागृहात २९ एप्रिल रोजी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महनीय व्यक्ती व संस्थांना पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.

या प्रसंगी अतिथी व प्रमुख पाहुणे म्हणून श्री. संदीप माळवी डॉ नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठानावाला, श्री. किसन सुक्रे श्री. जितेंद्र मेहता श्री. राजेश खांडेकर सौ. अंजली भोईर डॉ. सौ. स्वप्नाली कदम डॉ. सौ. शिवानी बॅनर्जी डॉ. सौ. अंजुषा पाटील डॉ. श्री. विश्वंबर शिंदे व सौ. शशी अग्रवाल उपस्थित होते.

यावेळी विविध शिक्षण संस्थांचा सत्कार करण्यात आला. त्यात मोतीलाल हरगोविंददास विद्यालय, शिव समर्थ प्राथमिक विद्यालय, शिव समर्थ माध्यमिक विद्यालय, के. जी. जोशी कला महाविद्यालय आणि एन. जी. बेडेकर वाणिज्य महाविद्यालय, शेठ नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठानावाला महाविद्यालय, अनिकेत क्लासेस,खर्डीकर क्लासेस या संस्थांचा समावेश होता

तसेच अनेक नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेवकांना यावेळी गौरविण्यात आले. त्यात श्री. वैभव कदम – नगरसेवक सौ. माधुरी मेटांगे – नगरसेविका श्री. आदेश भगत – नगरसेवक श्री. राकेश शिंदे – नगरसेवक सौ. वेदिका पाटील – नगरसेविका सौ. पल्लवी जगताप – नगरसेविका सौ. पूनम माळी – नगरसेविका सौ. अनिता ठाकुर – नगरसेविका श्री. संतोष तोडकर – नगरसेवक श्री. शहाजी खुप्से – नगरसेवक सौ. राजूल पाटील नगरसेविका यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुरस्कार समारंभाचे वैशिष्टय म्हणजे यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या जोड्याना गौरविण्यात आले त्यात श्री. पवन कदम व सौ. पल्लवी कदम (पती-पत्नी) श्री. राजेश मोरे व सौ. रुचीता मोरे (पती-पत्नी) सौ. एकता भोईर व सौ. यज्ञा भोईर (सासु-सुन) श्री. रमाकांत मढवी व कु. साक्षी मढवी (पिता-पुत्री) श्रीमती प्रमिला केणी व श्री. मंदार केणी (माता-पुत्र) श्री. अविनाश पाटील व कु. प्रियंका पाटील (पिता-पुत्री) श्री. भरत चव्हाण व कु. ओमकार चव्हाण (पिता-पुत्र) या जोड्याना गौरविण्यात आले.

प्रीतगंध प्रतिष्ठान चा सामाजिक कार्यासाठी सत्कार 

संस्थांना व विविध क्षेत्रातील तन मन धन अर्पून काम करणाऱ्या व्यक्तींना संस्थेतर्फे सन्मानित करण्यात आले. सामाजिक संस्थात संतोष म्हाडेश्वर संचलित प्रीतगंध प्रतिष्ठान, गीतगंध संगीत कार्यक्रम संस्था, मानव विकास संरक्षण समिती यांचा समावेश होता.

filter: 135; fileterIntensity: 0.08; filterMask: 0; cap

डॉक्टर चंद्रमोहन रानडे यांना शिक्षण क्षेत्रात व श्रीमती अस्मिता देव यांना सामाजिक क्षेत्रात अद्वितीय काम केल्याबद्दल गौरविले गेले. 

याशिवाय व्यक्तिगत सेवेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले त्यात ठाणे शहरातील शिक्षणसेवी डॉक्टर चंद्रमोहन रानडे व समाज माध्यमाद्वारे संस्कार वर्ग चालवणाऱ्या श्रीमती अस्मिता देव यांचा समावेश होता.

तसेच श्री किरण नाकती – सामाजिक क्षेत्र श्री. जतिनभाई शहा ( बिल्डर ) – व्यवसाय क्षेत्र सौ. सुजाता देशमुख ( उद्योजक ) – व्यवसाय क्षेत सौ. अस्मिता देव – सामाजिक क्षेत्र सौ. प्रतीक्षा बोर्डे – सांस्कृतिक क्षेत्र सौ. प्रियंका प्रकाश मोरे – शिक्षण क्षेत्र श्री. मधुकर माणिक पाटील – वकिली क्षेत्र कु. कृष्णाई सुहास फोंडके – सांस्कृतिक क्षेत्र
सुमन मिश्रा – क्रीडा क्षेत्र श्री. आकाश भास्कर देशमुख – साहित्य क्षेत्रकश्री. प्रदीप केळकर – क्रीडा क्षेत्र श्री. संतोष तावडे – साहित्य क्षेत्र श्री. वीरेंद्र रत्ने – कला क्षेत्र संपदा गोस्वामी ( प्लेबॅक सिंगर ) – कला क्षेत्र सबिना अली खान ( संस्थापिका आणि व्यवस्थापिका ) – व्यवसाय क्षेत्र डॉ. दीपक अरविंद खांडेकर – साहित्य क्षेत्र या महनीय व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करण्यात आला. आकर्षक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. जनादेश टीव्ही न्यूज चे संचालक श्री मंगेश प्रभूलकर व संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक मेहनत घेतली.

दिवंगत आशा भोसले यांच्या गाण्यांचा बहारदार कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला. कार्यक्रमाला रसिकांनी गर्दी केली होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button