भारतात वाढते आहे हेझ फंडची लोकप्रियता !
आर्थिक सल्लागार महेश म्हात्रे यांचा विशेष लेख
www
लेखक श्री महेश अनंत म्हात्रे
चेअरमन पिगी बॉक्स निधी लिमिटेड
आपला भारत देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने वाटचाल करतो आहे. अशावेळी माहितीयुगाच्या या काळात पाश्चिमात्य आर्थिक गुंतवणूक संकल्पना वेगाने आपण भारतीय आत्मसात करत आहोत. प्राचीन काळात सोने हा एकमेव सर्वोत्तम व सुरक्षित गुंतवणूक पर्याय होता. सोन्याचे रूपांतर कधीही चलनात अथवा स्थावर किंवा जंगम मालमत्तेत करणे शक्य होत असे.याशिवाय सोन्याचे मूल्य सतत वाढत असल्याने त्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जायची. नंतर बँकिंग व्यवसायाचा दबदबा वाढल्याने सरकारी बँका, पोस्ट खाते यातील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाऊ लागली. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक ठराविक समाजाचे लोक करायचे. शेअर मार्केट व व्यवसायाचे पिढीजात ज्ञान व रिस्क घेण्याची उपजत वृत्ती यामुळे शेअर मार्केट मध्ये ठराविक व्यापारी वर्गाचा दबदबा होता व आजही आहे.
हे चित्र पालटले ते माहिती व दळणवळण क्रांती आणि मुच्युअल फंडमुळे. डिजिटल क्रांतीमुळे घरबसल्या एका क्लिकवर अगदी थोडीशी रक्कम शेअर बाजारात गुंतवता येणे शक्य झाले. विविध कंपन्यांनी मुच्युअल फंड सुरू केल्याने सिपद्वारे सामान्य माणूसही थोडी थोडी रक्कम महिन्याकाठी सहज गुंतवू लागला.’मुच्युअल फंड सही है’ सारख्या आक्रमक जाहिरातीमुळे लोक या गुंतवणुकीमध्ये रस घेवू लागले.
आता पाश्चात्य देशांत प्रचंड लोकप्रिय असलेली हेझ फंड संकल्पना भारतातही लोकप्रिय होत आहे पण अनेक लोकांना याबाबत कल्पना नाही यामुळे हा लेखप्रपंच…
हेझचा साधा व सरळ अर्थ आहे गुंतवणूक. मात्र ही गुंतवणूक हाय नेटवर्थ व्यक्ती म्हणजे अतिरिक्त उत्पन्न चांगले आहे अशा व्यक्ती करतात. ही गुंतवणूक शेअर मार्केट प्रमाणे थेट करायची नसून त्यासाठी उत्तम ज्ञान असलेल्या हेझ फंड मॅनेजरची मदत लागते.
शेअर मार्केट तेजीत असो अथवा मंदीत उत्तम हेझ फंड मॅनेजर नेहमी आपल्या क्लायंटला उत्तम परतावा म्हणजे रिटर्न्स मिळवून देतो. यासाठी खालील अलिखित नियम पाळावे लागतात.
*१ गुंतवणूकदार जेवढी रक्कम इंव्हेस्ट करतील म्हणजे गुंतवतील ती २ ते ५ वर्षासाठी लॉक राहील म्हणजे काढून घेता येणार नाही.*
*२ हेझ फंड मॅनेजर मुच्युअल फंड मॅनेजर प्रमाणे विविध गुंतवणूक पर्याय निवडून क्लायंट ची रक्कम इंवेस्ट करेल. त्यात रिअल इस्टेट, शेअर बाजार, कमोडिटी बाजार, सोने, चित्रपट उद्योग, परदेशी शेअर बाजार क्रीप्टो करन्सी इत्यादी सर्व प्रकारच्या पर्यायाचा विचार होतो.*
*३ गुंतवणुकीवर परतावा म्हणजे रिटर्न्स अतिशय उच्च म्हणजे मासिक ५ ते १० पर्यंत असतो.*
*४ परतावा उच्च असल्याने रिस्क ही जास्त असते. पण उत्तम फंड मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित सांभाळतो.*
*५ एकूण गुंतवणुकीवर २ टक्के व्यवस्थापन फी व २० टक्के कामगिरी शुल्क फंड मॅनेजर आकारतो. उदा. तुम्ही जर ५०००० रुपये गुंतवले तर १००० रुपये व्यवस्थापन शुल्क असेल व या रकमेवर जेवढा फायदा होईल उदा ५० हजार वर वार्षिक ६० हजार फायदा झाला तर १२ हजार कामगिरी शुल्क असेल. व्यवस्थापन शुल्क प्रथम घेतले जाईल व कामगिरी शुल्क नफा झाल्यानंतर घेतले जाईल.*
आता हा प्रश्न सतत विचारला जातो की ही हेझ फंडची संकल्पना चांगली आहे. पण भारतात कायदेशीर आहे का ?
*तर याचे उत्तर आहे हो अगदी कायदेशीर व भारत सरकार मान्यताप्राप्त आहे*
*सेबी म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे कॅटेगरी ३ अल्टरनेट इंवेस्टमेंट फंड खाली ही गुंतवणूक कायदेशीर व फायदेशीर आहे.*
किमान १ कोटी रुपयाची गुंतवणूक करणे बंधनकारक असते याची नोंद घ्यायला हवी.
भारतात अनेक चित्रपट कलाकार, नामवंत खेळाडू, राजकारणी, व्यापारी, उच्च मध्यम वर्गीय लोक
हेझ फंड मध्ये रक्कम गुंतवत आहेत व चांगला परतावा मिळवत आहेत.
हेझ फंड बाबत अधिक माहिती हवी असल्यास संपर्क :
+91 77385 65253