अ. भा.मराठा महासंघाच्या बाजूने महत्वपूर्ण निकाल
महासंघाच्या भव्य मेळाव्यात महत्वाची घोषणा

छायाचित्रातील मान्यवरांची नावे
आ.श्री. दिलीपदादा जगताप (राष्ट्रीय अध्यक्ष- अखिल भारतीय मराठा महासंघ), श्री. राजेश ज. घाणेकर (संयुक्त सरचिटणीस- अ.भा. मराठा महासंघ), डॉ. सौ. सुवर्णा योगेश पवार (मुंबई अध्यक्ष- अ.भा. महिला मराठा महासंघ), श्री. अविनाश राणे (मुंबई अध्यक्ष, अ.भा. मराठा महासंघ) ॲड.श्री. विरेंन्द्र शशिकांत पवार (मराठा क्रांतीमोर्चा, महाराष्ट्र प्रतिनिधित्व), श्री. धोंडी जाधव (उपाध्यक्ष- अ.भा. मराठा महासंघ, महाराष्ट्र प्रदेश), श्रीमती नम्रता भोसले (सरचिटणीस- मुंबई, अ.भा. महिला मराठा महासंघ),
अखिल भारतीय मराठा महासंघचा मेळावा नुकताच चेंबूर येथे २५ मे २०२६ रोजी संपन्न झाला. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बाजूने महत्वपूर्ण निकाल माननीय न्यायालयाने दिला असून महासंघाच्या इमारती ची निर्माण प्रक्रिया सुरू होणार असल्याची घोषणा टाळ्यांच्या कडकडाटात करण्यात आली.
सदर घोषणा करताना अखिल भारतीय मराठा महासंघ चे राष्ट्रीय अध्यक्ष आ. दिलीपदादा जगताप म्हणाले की न्यायालयाच्या या निर्णयाने अखिल भारतीय मराठा महासंघ या महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि ऐतिहासिक सामाजिक संस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा, तसेच संस्थेच्या कार्यात जाणीवपूर्वक कायदेशीर व सामाजिक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न संस्थेतीलच काही घटकांकडून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला होता. मात्र, “सत्य कधीही लपत नाही” या उक्तीचा पुनरुच्चार करत, माननीय न्यायालयाने या प्रकरणातील सर्व तथ्ये तपासून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बाजूने न्यायनिवाडा केला आहे.
संस्थेच्या अधिकृत भूमिकेला आणि अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या विविध खोट्या आरोपांवर माननीय न्यायालयात सविस्तर सुनावणी झाली. न्यायालयाने सर्व बाजू तपासून महासंघाची भूमिका कायदेशीर व योग्य असल्याचे स्पष्ट केले असून, विरोधकांचे दावे फेटाळून लावले आहेत.
समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा पर्दाफाश:
संस्थेच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महासंघाच्या कार्यात विघ्न आणून समाजात गैरसमज आणि तेढ निर्माण करण्याच्या या कृत्यामध्ये खालील व्यक्तींचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे:
१. श्री. राजेंद्र नामदेवराव कोंढरे
२. श्री. प्रकाश वसंतराव देशमुख
३. श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील
४. श्री. विनायक मोतीराम पवार
५. प्रमोद बळवंत जाधव
या व्यक्तींनी वैयक्तिक हितसंबंधांसाठी संस्थेची बदनामी करण्याचा आणि मराठा समाजात संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्याला न्यायालयाने आपल्या निकालपत्राद्वारे पूर्णपणे लगाम घातला आहे.
पुढील दिशा आणि कायदेशीर कारवाईचा इशारा:
या ऐतिहासिक आणि सत्यवादी निकालानंतर अखिल भारतीय मराठा महासंघावरील मराठा समाजाचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. संस्थेच्या वतीने हे स्पष्ट करण्यात येत आहे की, समाजहिताचे आणि आरक्षणाचे, तसेच शैक्षणिक व आर्थिक उन्नतीचे कार्य यापुढेही दुप्पट ताकदीने सुरू राहील.
तसेच, ज्या व्यक्तींनी किंवा घटकांनी जाणीवपूर्वक संस्थेची बदनामी करून समाजाची दिशाभूल केली आहे, त्यांच्याविरोधात आगामी काळात न्यायालयीन अवमान (Contempt of Court) आणि फौजदारी मानहानीची (Criminal Defamation) कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महासंघाच्या वतीने देण्यात येत आहे.
यावेळीआ.श्री. दिलीपदादा जगताप (राष्ट्रीय अध्यक्ष- अखिल भारतीय मराठा महासंघ), श्री. राजेश ज. घाणेकर (संयुक्त सरचिटणीस- अ.भा. मराठा महासंघ), डॉ. सौ. सुवर्णा योगेश पवार (मुंबई अध्यक्ष- अ.भा. महिला मराठा महासंघ), श्री. अविनाश राणे (मुंबई अध्यक्ष, अ.भा. मराठा महासंघ) ॲड.श्री. विरेंन्द्र शशिकांत पवार (मराठा क्रांतीमोर्चा, महाराष्ट्र प्रतिनिधित्व), श्री. धोंडी जाधव (उपाध्यक्ष- अ.भा. मराठा महासंघ, महाराष्ट्र प्रदेश), श्रीमती नम्रता भोसले (सरचिटणीस- मुंबई, अ.भा. महिला मराठा महासंघ) अजित पाटील उपस्थित होते.
वरील बातमीचा व्हिडिओ पहा :