hi Hindi en English mr Marathi ur Urdu
आंतरराष्ट्रीयआरोग्यक्रीडागुन्हेजीवनशैलीटॉप न्यूजतंत्रज्ञानताज्या बातम्याधर्म / ज्योतिषमनोरंजनराजकारणराष्ट्रीयव्यापारशिक्षण

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सर्वसमावेशक कार्याची दखल घेण्याची गरज

अ.भा.मराठा महासंघाच्या कार्यालयाला शिवस्वराज्य न्यूजचे प्रमुख संपादक अजित पाटील यांच्या सदिच्छा भेटीच्या वेळी व्यक्त केली भावना

 

डावीकडून श्री धोंडु जाधव (उपाध्यक्ष- अ.भा. मराठा महासंघ), श्री राजेश ज. घाणेकर (संयुक्त सरचिटणीस, अ.भा. मराठा महासंघ) श्री दिलीपदादा जगताप (राष्ट्रीय अध्यक्ष, अ.भा. मराठा महासंघ), श्री अजित ह. पाटील (संपादक- शिवस्वराज्य न्युज चॅनल), सौ. सुवर्णा योगेश पवार (अध्यक्ष- मुंबई, अ.भा. महिला मराठा महासंघ), श्रीमती अंकीता राणे,( सभासद- अ.भा. महिला मराठा महासंघ), श्री बाळकृष्ण माने (आजीव सभासद, अ.भा. मराठा महासंघ)

 

१२५ वर्षे अथक सामाजिक कार्याची परंपरा असलेला अखिल भारतीय मराठा महासंघ केवळ एका जातीपूरता मर्यादित नसून महासंघाचे धोरण व कार्य सर्वसमावेशक असल्याचे गौरवोद्गार शिव स्वराज्य न्यूज वृत्तसंस्थेचे संस्थापक व प्रमुख संपादक अजित पाटील यांनी काढले. संस्थेच्या दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृह संकुलातील कार्यालयाला अजित पाटील यांनी सदिच्छा भेट दिनांक १९ मे २०२६ रोजी दिली त्यावेळी त्यांनी ही भावना व्यक्त केली. केवळ मराठाच नव्हे तर सर्व जातीधर्माच्या लोकांनी मराठा महासंघाच्या कार्यात सहभागी होऊन संस्थेच्या सामजिक उपक्रमांत आपले योगदान दिले पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी अजित पाटील यांनी अ.भा.मराठा महासंघ संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. दिलीपदादा जगताप यांना एक निवेदन सादर केले. यावेळी संस्थेचे सदस्य  श्री धोंडु जाधव (उपाध्यक्ष- अ.भा. मराठा महासंघ), श्री राजेश ज. घाणेकर (संयुक्त सरचिटणीस, अ.भा. मराठा महासंघ)  सौ. सुवर्णा योगेश पवार (अध्यक्ष- मुंबई, अ.भा. महिला मराठा महासंघ), श्रीमती अंकीता राणे,( सभासद- अ.भा. महिला मराठा महासंघ), श्री बाळकृष्ण माने (आजीव सभासद, अ.भा. मराठा महासंघ) उपस्थित होते.

दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृह संकुलातील संस्थेच्या प्रशस्त कार्यालयात ही भेट संपन्न झाली. शिव स्वराज्य न्यूज ही वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज यांच्या कार्याचा आदर्श दीपस्तंभ मानून वाटचाल करते आहे. अशा वेळी हाच आदर्श समोर ठेवून महाराष्ट्राच्या विकासासाठी अथक मेहनत करणाऱ्या अखिल भारतीय मराठा महासंघ या संस्थेचा पाठिंबा आम्हाला अजून प्रेरणादायी ठरेल असा विश्वास अजित पाटील यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button