hi Hindi en English mr Marathi ur Urdu
जीवनशैली

साहित्यिक परिचय : श्री. बाबासाहेब सौदागर

लेखक, कवी, चित्रपट लेखक, गीतकार, कलाकार व निसर्गकवी

आजच्या साहित्य सदरात परिचय करून घेऊया प्रसिद्ध लेखक श्री. बाबासाहेब सौदागर यांचा…

परिचय :

श्री. बाबासाहेब सौदागर
प्रसिद्ध चित्रपट गीतकार/चरित्र अभिनेते/निसर्ग कवी/पटकथा संवाद लेखक.

पत्ता-चित्ररंग बंगला,रासकर नगर, श्रीरामपूर जि अहिल्यानगर.४१३७०९.
मो.नं.९२२६१८००३९.

प्रकाशित साहित्य –
कविता संग्रह- सांजगंध,पिवळण,मृगपक्षी
चित्ररंग (चित्रपट गीत संग्रह)
पायपोळ (लोकप्रिय आत्मचरित्र)
भंडारभुल (कथासंग्रह)
भेद्रपान (आत्मकथन)- संस्कृती प्रकाशन पुणे.
धौस(कादंबरी) -दिलीपराज प्रकाशन संस्था पुणे.

*९० पेक्षा जास्त चित्रपटात गीतलेखन.लोकप्रिय चित्रपट –
सत्ताधीश, झुंजार, झुंज एकाकी,सासरची का माहेरची, जयहिंद,मन्या धाव मन्या, नातं मामा भाचीचं,लग्नाची वरात लंडन च्या घरात’,चंद्रभागा,टोपी घाला रे,मी सिंधुताई सपकाळ,मुलगा,लयी भन्नाट,सासर माझं दैवत,हाळद तुझी कुंकू माझं,चंद्रपुरची देवी महाकाली, उमंग,राजमाता जिजाऊ,अंर्तदाह,गणगौळण झाली सुरु, मध्यमवर्ग,शिवा,भंपर लाटरी,तुझा दुरावा, घुंगराच्या नादात,लेक लाडकी,निर्भया, गुंतले हृदय माझे, जुगाड खव्याची बर्फी,बापु मिसिंग, प्राक्तन इत्यादी.

*मालिका साठी गीतलेखन*
आशा अभिलाषा,भंडारभुल, ईनमिन साडेतिन’,बंदीशाळा, स्वराज्य रक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता,चिमणी पाखरं, क्रांती सिंह नाना पाटील,विज्ञानाचा कल्पतरु,शिवारगप्पा इत्यादी.

*पुरस्कार*-
कवीश्रेष्ठ ग.दी.माडगुळकर पुरस्कार, गीतकार जगदीश खेबुडकर पुरस्कार, जिजाऊ विश्व भुषण मराठा पुरस्कार, कवीवर्य आ.य.पवार साहित्य पुरस्कार, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुरस्कार इत्यादी ३५०पेक्षा जास्त पुरस्कार.
पुरस्कार – गिरणा गौरव पुरस्कार नाशिक

*शासकीय सन्मान*
सह्याद्री सर्वोत्कृष्ट सिने गीतकार पुरस्कार, मराठी चित्रपट परीक्षण समिती मध्ये परीक्षक म्हणून काम केले.

*अध्यक्ष*
अहमदनगर पहिल्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद.
मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन मानवत परभणी अध्यक्षपद.
कुद्रेमानी कर्नाटक बेळगाव ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड.
उचगाव -बेळगाव २३व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड.

*दुरदर्शन, आकाशवाणी वर अनेक कार्यक्रमाचे सादरीकरण.
जेष्ठ चित्रपट अभिनेते विक्रम गोखले यांनी *दुसरी बाजू*ही एक तासाची दिर्घ मुलाखत लोकप्रिय.

*माझ्या गाण्याची जन्मकथा**आणि *चित्ररंग*
चे अनेक कार्यक्रम.(देशविदेशात)

माझ्या गाण्याची जन्मकथा -अमळनेर येथिल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य स्टेजवर झालेली मुलाखत खुप गाजली.

*भुमिका केलेले चित्रपट*
सत्ताधीश, घुंगराच्या नादात,शिवा,तुझा दुरावा, गणगौळण झाली सुरु इत्यादी.

*सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या एफ वाय बी ए च्या अभ्यासक्रमात *मध्यमवर्ग*चित्रपटातील ‘झाले शहीद त्यांचे व्हावेत पुर्ण हेतु..यावे पुन्हा नव्याने स्वातंत्र देवते तु ‘ही कविता ७००महाविद्यालयां मधुन शिकविली जाते आहे.

*ज्या दगडावर शेंदुर पडला*
ही *मृगपक्षी* कविता संग्रहातील कविता अहिल्यानगर जिल्हा मराठा स्वायत्त विद्यापीठ -न्यु आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स महाविद्यालय तृतीय वर्ष मराठी अभ्यासक्रमात .
*पायपोळ* आत्मचरित्र प्रताप महाविद्यालय स्वायत्त विद्यापीठ अभ्यासक्रमात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button