जोगेश्वरी पूर्व येथील बांद्रेकरवाडी विभागातील प्रसिद्ध साई मंदिरात दरवर्षी प्रमाणे रामजन्म सोहळा उत्साहात संपन्न झाला असून मंडळाचे यंदाचे हे ३८ वे वर्ष होते.
पहाटे साडे पाच वाजता काकड आरतीने सोहळ्यास सुरुवात झाली. त्यानंतर मंदिरातर्फे अभिषेक व भविकांतर्फे सामुदायिक अभिषेक करण्यात आला. सकाळी १० वाजता राम जन्मावर किर्तनास सुरुवात करण्यात आली. दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांनी राम जन्म सोहळ्यास प्रारंभ झाला. त्या नंतर दुपारी १ ते ३ महाप्रसाद आयोजित करण्यात आला. दुपारी ४ वाजता मंदिरातून पालखी मिरवणुकीचे प्रस्थान झाले. रात्री दहा वाजता पालखीची सांगता करण्यात आली. शुक्रवारी सकाळी १० वाजता सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले तर संध्याकाळी ७:३० वाजता सुस्वर भजन आयोजित केले गेले
या सोहळ्याचे आयोजन साई मंदिर समितीने केले असून अध्यक्ष नरेंद्र पवार, मधू शिंदे, अमर मालवणकर धडाडीचे कार्यकर्ते लक्ष्मण सैदाणे सुरेश सैदाणे प्रकाश सैदाणे प्रशांत साटम पंकज साटम संजय निकम दीपक मटकर यांनी सोहळा यशस्वी व्हावा म्हणून अथक मेहनत घेतली.

brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 39;