hi Hindi en English mr Marathi ur Urdu
आंतरराष्ट्रीयआरोग्यक्रीडागुन्हेटॉप न्यूजतंत्रज्ञानताज्या बातम्याधर्म / ज्योतिषमनोरंजनराजकारणराष्ट्रीयव्यापारशिक्षण

वांद्रे स्थानकाने अखेर घेतला मोकळा श्वास

मुंबई महानगर पालिकेची मोठी कारवाई


 

विशेष प्रतिनिधी

गेली अनेक दशके वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला विळखा घालून बसलेल्या अनधिकृत झोपडपट्टीवर मुंबई महानगर पालिकेने आपला बुलडोझर चालवला. गेली अनेक वर्षे याठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अनधिकृत व्यवसायी गाळे यांच्यावर पालिकेने धडाकेबाज कारवाई केली. यावेळी थोडा तणावही निर्माण झाला पण पालिकेच्या मदतीला पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्याने कारवाई व्यवस्थित पार पडली. आता पूर्ण वांद्रे परिसर झोपडी मुक्त होईल तेथील गरीब जनतेला स्वच्छ व सुंदर घरे मिळतील अशी अपेक्षा आहे. 

तीन ते चार मजले असलेल्या झोपड्या, अनधिकृत व्यवसाय, अगदी रेल्वेच्या पुलाला खेटून असलेले पत्र्याचे माळे, अस्वच्छता, गुन्हेगारी हेच चित्र वांद्रे पूर्व म्हटले की डोळ्यासमोर यायचे. अगदी लगतच्या धारावी झोपडपट्टीचे एक्स्टेंशन अशी स्थिती होती. उन्हाळयात आगी लागून झोपड्या भस्मसात व्हायच्या व त्यानंतर अधिक वाढायच्या. पावसाळ्यात अपघात ठरलेले होते. स्थानिक राजकारणी व झोपडपट्टी दादा यांच्या हस्तक्षेपामुळे पालिका अधिकारी हतबल असायचे. आता या सर्वाला आळा बसेल अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

वरील बातमीचा व्हिडिओ पहा

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button