hi Hindi en English mr Marathi ur Urdu
आंतरराष्ट्रीयजीवनशैलीटॉप न्यूजतंत्रज्ञानताज्या बातम्याराष्ट्रीयव्यापारशिक्षण

ठाणे येथे मराठी उद्योजकता दिवस उत्साहात साजरा

अनेक मराठी उद्योजकांनी घेतला सहभाग

समर्थ खरे गृहउद्योगाच्या  संचालिका डावीकडून सौ जयश्रीताई देशमुख व सौ.अंजलीताई ओक

 



विशेष वृत्त रवींद्र गावडे ठाणे दिनांक ११ जुलै २०२६

ठाणे येथील टीप टॉप प्लाझा हॉटेलात दिनांक ११ व १२ जुलै रोजी मराठी उद्योजकता दिवस हा सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट या संस्थेद्वारे आयोजित करण्यात आला होता. अनेक मराठी उद्योजकांनी यात सहभाग घेतला होता. आमच्या प्रतिनिधीने यातील काही उद्योजकांची माहिती घेतली.

समर्थ खरे गृहउद्योग

 

सौ. अंजली ओक व सौ. जयश्री देशमुख यांच्या समर्थ खरे गृहउद्योग यांचा स्टॉल विविध नावीन्यपूर्ण पदार्थांनी सजलेला होता. 

             

खुसखुशीत व तोंडात विरघळणारे साजूक तुपातील चिरोटे, नावीन्यपूर्ण इटालियन फ्लेवरचे सॉल्टी चिरोटे, खमंग काटेरी चकल्या, साजूक तुपातले अनारसे, ड्राय फ्रुटस् लाडू अशा विविध खाद्यपदार्थांनी हा स्टॉल सजला होता. गुलाबजाम व श्रीखंड हे खास मराठमोळे पदार्थही ऑर्डरनुसार समर्थ खरे उद्योगामार्फत बनवले जातात.

‘ ट्रेडिशनल फ्लेवर्स स्मोक ‘ अशी टॅगलाईन असलेल्या समर्थ खरे उद्योगात पदार्थ तयार करताना पदार्थाच्या सामग्रीची शुद्धता व स्वच्छ प्रक्रिया याची काटेकोर काळजी घेतली जाते. आमच्या प्रतिनिधीने जेव्हा त्यांच्या स्टॉलवरील पदार्थांची चव चाखली तेव्हा याबाबत खात्रीच पटली.

सौ अंजली ओक व सौ. जयश्री देशमुख या सख्ख्या भगिनींनी सुरू केलेला हा व्यवसाय स्वामी समर्थांच्या कृपेने यशाच्या पायऱ्या चढतो आहे. 

समर्थ खरे गृहउद्योगाच्या विविध उत्पादनांसाठी कृपया खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.
सौ. अंजली ओक  +91 9820692289
सौ. जयश्री देशमुख. +91 9833846490

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button