hi Hindi en English mr Marathi ur Urdu
जीवनशैलीटॉप न्यूजताज्या बातम्या

शिवस्वराज्य विचारमंच : केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणी उपग्रह चित्रीकरणाची मदत घ्यावी

यशवंत देवधर, पुणे भ्रमणध्वनी : ९८५०६ ६७८४७

 

शिवसंवाद : केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणी उपग्रह चित्रीकरणाची मदत घ्यावी  

पुण्यात नुकत्याच घडलेल्या केतन अग्रवाल या तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी पुणे पोलिस अत्यंत तत्परतेने तपास करत आहेत. याबद्दल त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे. सीसीटीव्ही फुटेजची मदतही घेतली जात आहे. मात्र लोह गडावर जेथे हा प्रकार घडला त्या विंचू कडा या ठिकाणी कोणताही सीसीटीव्ही नसल्याने गुन्ह्याला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणी नाही, हे सांगण्यात येत आहे.          अशा वेळी एक सुचवावेसे वाटते की कृत्रिम उपग्रह चित्रीकरणाची मदत पुणे पोलिसांनी घ्यावी. अंतराळात नासा, भारताची इस्रो व युरोपियन सॅटेलाईट एजंसीचे शेकडो उपग्रह फिरत असतात व चित्रीकरण करत असतात. लोहगडावर ही घटना घडली त्यावेळी कोणता न कोणता उपग्रह या भागाचे चित्रीकरण करत असणारच.भारत सरकारने जर या बद्दल माहिती काढून त्या भागातील उपग्रह चित्रीकरण उपरोक्त संस्थाकडून मिळवले तर गुन्ह्याचा थेट पुरावा हाती लागण्याची शक्यता आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात २००९ साली एका कुमारवयीन मुलाच्या बेपत्ता होण्याचे रहस्य उपग्रह चित्रीकरणामुळे उलगडले होते. तेथील पोलिसांनी त्या मुलाचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ असल्याचे उपग्रह चित्रीकरणाच्या सहाय्याने शोधले होते. यामुळे सरकारला व पुणे पोलिसांना नम्र विनंती की त्यांनी माझ्या सूचनेचा जरूर विचार करावा.

यशवंत देवधर, पुणे

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button