‘मराठी उद्योजकता दिवस’ ठाण्यात उत्साहात साजरा
सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे आयोजन

ग्रो मंत्रा शेअर मार्केट अकॅडमी दालन
ठाणे येथील टीप टॉप प्लाझा हॉटेलात दिनांक ११ व १२ जुलै रोजी मराठी उद्योजकता दिवस हा सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट या संस्थेद्वारे आयोजित करण्यात आला होता. अनेक मराठी उद्योजकांनी यात सहभाग घेतला होता. आमच्या प्रतिनिधीने यातील काही उद्योजकांची माहिती घेतली.
ग्रो मंत्रा शेअर मार्केट अकॅडमी
मराठी माणूस शेअर मार्केटपासून दूर राहतो अशी एक सर्वसाधारण समजूत आहे. याचे कारण शेअर मार्केट बद्दल अनामिक भीती असतेच पण तोटा झाला तर काय ? असा विचार मनात घोळतोच. याशिवाय मार्केटच्या चढ-उताराच्या बातम्यांनी मराठी माणूस शेअर मार्केट मध्ये अभावानेच आढळतो.
सर्वात महत्वाचे कारण म्हणजे शेअर मार्केटच्या कामाबद्दल अज्ञान व योग्य प्रशिक्षण न घेणे यामुळे एक उत्तम गुंतवणूक पर्याय असताना आपण सोने, स्थावर मालमत्ता अशा कमी परतावा देणाऱ्या व गुंतवणूक दीर्घकाळ अडकवून ठेवण्यास भाग पाडणाऱ्या पर्यायाकडे वळतो.
तुषार मळेकर यांची ग्रो मंत्रा शेअर मार्केट अकॅडमी ही सामान्य माणसाला शेअर बाजार, शेअर बाजारात गुंतवणूक याबद्दल सखोल माहिती देते व योग्य प्रशिक्षण देते. शेअर बाजार म्हणजे केवळ सट्टा बाजार नाही तर तो एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे. परदेशात विशेषतः अमेरिका व युरोपीय देशांत शेअर बाजारात गुंतवणुकीत सामान्य माणसांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे तेथे उद्योजकतेला चालना मिळतेच शिवाय सामान्य माणसाला नोकरी, व्यवसाय व्यतिरिक्त आर्थिक उत्पन्न मिळते. एक गुंतवणूक पर्याय म्हणून किंवा एक आवडीचे क्षेत्र म्हणून शेअर बाजाराबद्दल सखोल माहिती साठी ग्रो मंत्रा शेअर अकादमीच्या खालील पत्त्यावर किंवा संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.
ग्रो मंत्रा शेअर अकॅडमी
02, पाटील बिल्डिंग, चकाला व्हीलेज, अंधेरी पूर्व, मुंबई 400 099
Contact No +91 9833201013