hi Hindi en English mr Marathi ur Urdu
आंतरराष्ट्रीयजीवनशैलीटॉप न्यूजताज्या बातम्याव्यापार

ठाण्यात संपन्न झाला ‘मराठी उद्योजकता दिवस’

नावीन्यपूर्ण उद्योग दालनांनी वेधून घेतले लक्ष !

 साजिरीच्या संचालिका.सौ दीपा लेले – चेऊलकर

ठाणे येथील टीप टॉप प्लाझा हॉटेलात दिनांक ११ व १२ जुलै रोजी मराठी उद्योजकता दिवस हा सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट या संस्थेद्वारे आयोजित करण्यात आला होता. अनेक मराठी उद्योजकांनी यात सहभाग घेतला होता. आमच्या प्रतिनिधीने यातील काही उद्योजकांची माहिती घेतली.

साजिरी सण समारंभ

भारत हा सण उत्सव उत्साहात साजरा करणाऱ्यांचा देश आहे. विशेषतः हिंदू धर्मात अनेक सण आहेत व दर महिन्याला कोणता ना कोणता सण अथवा उत्सव असतोच. याशिवाय पूजा, भंडारा, होमहवन, विवाह सोहळा, साखरपुडा, बारसे आयोजित होत असते. या सण समारंभासाठी विविध वस्तू लागतात ज्या एका ठिकाणी मिळणे शक्य नसते. मग विविध दुकाने पालथी घाला व वस्तू मिळवा हे आलेच. यात वेळ व बराच पैसा खर्च होतो.

हेच लक्षात घेऊन सौ. दीपा लेले-चेऊलकर यांनी सर्व आवश्यक वस्तू एकाच ठिकाणी मिळतील अशी नावीन्यपूर्ण उद्योग संकल्पना प्रत्यक्षात आणली त्या उद्योगाचे नाव ‘साजिरी सण समारंभ’

या येथे सर्व सणांसाठी आवश्यक अशा वस्तू उदा आंब्याचा डहाळा, केळीचे पान, कमळ, रांगोळी, झेंडे, देवतेसाठी आसन, शेले, पाट, गुढी वस्त्र, ओटी, खण ओटी,   समारंभासाठी आवश्यक साखरपुडा, ओटीचा रुमाल, शेला, आंतरपाट, पायघडी, नोटांचा हार, नोटांचा शेला, ओवाळणीसाठी  दिवे, भेट वस्तू साठी पर्स, तोरणे, ट्रे, तुळशी वृंदावन, प्लांटस, बटवे, टेबल रनर, कुशन कव्हर सर्व एकाच ठिकाणी मिळतात. यामुळे दुकाने फिरण्याची दगदग वाचते.

साजिरी सण समारंभ मधून वस्तू मागविण्यासाठी  संपर्क :

शॉप नंबर १, नारायण निवास, मॅकडोनाल्ड जवळ हनुमान रोड, विलेपार्ले पूर्व मुंबई ४०० ०५७.

संपर्क क्रमांक :
9867088877 / 9136405267

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button