हिंदमाता गोविंदा पथकाच्या दहीहंडी सरावास प्रारंभ
आमचे प्रतिनिधी जिग्नेश चाळके यांच्याकडून
एआय निर्मित चित्र
श्रावण सुरू झाला की दहीहंडी पथकांना सरावाचे वेध लागतात. मुंबईतील जोगेश्वरी हे उपनगर दहीहंडी पथकांचा बालेकिल्ला मानला जातो. विविध प्रसिध्द दहीहंडी पथके याच भागात आहेत. विविध विश्व विक्रम करणारे जय जवान पथक, कोकण नगर गोविंदा पथक, तसेच बालउत्साही गोविंदा पथक, हिंदमाता गोविंदा पथक, रॉयल मॅक्स गोविंदा पथक अशी अनेक पथके या जोगेश्वरी उपनगरात आहेत.
हिंदमाता गोविंदा पथकांच्या सरावाला सुरुवात
मेघवाडी येथील प्रसिद्ध हिंदमाता क्रीडा मंडळाच्या हिंदमाता गोविंदा पथकाने दहीहंडी सरावास ११ जुलै रोजी सरावास रीतसर सुरुवात केली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी सदस्य व उत्साही बालगोविंदा उपस्थित होते. इतर मंडळांच्या सरवास गुरुपौर्णिमेला म्हणजे २९ जुलै २०२६ रोजी सुरुवात होण्याची शक्यता आहे. दही हंडी सराव हा अत्यंत महत्त्वाचा असतो. याचे कारण हल्ली किमान ७ ते ९ थर लावले जातात.यासाठी तयारी करणे अतिशय गरजेचे असते.
बातमीचा व्हिडिओ पाहा
जिग्नेश चाळके शिव स्वराज्य प्रतिनिधी