रामरक्षा आंदोलनानंतर शिवसेनेचा आता नगरपालिकांना दणका, गटार पूजन आंदोलन
नालेसफाई न झाल्याच्या निषेधार्थ ठाणे येथे गटार पूजन

अजित पाटील कांदिवली, ठाणे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केंद्रातील भाजप सरकारला अयोध्येतील राममंदिर चोरी प्रकरणी राज्यात रामरक्षा आंदोलनांचा धडाका लाऊन घेरलेले असतानाच ठाण्यात गटार पूजन आंदोलन करून आता ठाणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही दणका दिला आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या दिवा परिसरातील नालेसफाईच्या कामांवरून राजकीय वातावरण तापले होते. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी थेट ‘गटार पूजन’ केले.
आदित्य ठाकरे यांनी घेतला कांदिवली येथील आंदोलनात सहभाग
अयोध्येतील राममंदिर चोरी प्रकरणी भाजप सरकारचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महाराष्ट्रभर राम रक्षा आंदोलन सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कांदिवली पश्चिम येथील काळा हनुमान मंदिरात माजी मंत्री शिवसेना आमदार व युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रामरक्षा व हनुमान चालीसा पठणाचा सोहळा आयोजित करण्यात आला.या वेळी मोठ्या प्रमाणात रामभक्त उपस्थित होते. हनुमानाचा वेश परिधान करणाऱ्या आंदोलकास पाहण्यास लोकांनी गर्दी केली होती. टाळ मृदुंग वाजवत आंदोलनस्थळी जाणारे कट्टर शिवसैनिक लोकांच्या कुतूहलाचा विषय होते.
ठाणे येथे राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली महाआरती