hi Hindi en English mr Marathi ur Urdu
आंतरराष्ट्रीयटॉप न्यूजताज्या बातम्याराष्ट्रीयव्यापारशिक्षण

सहकार क्षेत्रात व्यावसायिक व्यवस्थापन असावे

सहकार सप्ताह निमित्त विशेष संपादकीय

 

सहकार सप्ताह निमित्त संपादकीय

दिनांक २९ जून ते ६ जुलै हा सप्ताह ‘सहकार सप्ताह ‘ म्हणून साजरा होत आहे. या निमित्ताने प्रकाशित ‘सहकारी महाराष्ट्र ‘ या सहकार चळवळीच्या मुखपत्राच्या विशेषांकाचे वाचनही करण्याचा योग आला व खात्री पटली की आपले राज्य महाराष्ट्र खरोखर सहकार चळवळीची गंगोत्री आहे. मात्र आपल्या राज्याला गुजरात, राजस्थान या राज्याकडून प्रखर स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे.

सहकारी संस्थांसाठी व्यावसायिक व्यवस्थापन

(Professional Management) अनिवार्य करणे, ज्यामुळे सहकारी संस्था खाजगी आस्थपनाप्रमाणे व्यावसायिक होतील. तसेच बिझनेस मॅनेजमेंट शिकणाऱ्या युवक युवतींना ट्रेनी तत्त्वावर सहकारी संस्थात चांगल्या मानधनावर नियुक्ती दिल्यास त्यांच्या शिक्षणासाठी हे ट्रेनिंग उपयुक्त ठरेल तसेच त्यांच्या कल्पनांचा फायदा सहकारी संस्थेला होईल.

सहकार चळवळ अधिक व्यापक व्हायला पाहिजे

सध्या बँकिंग, साखर कारखाने, सूतगिरण्या, गृहवस्तू भांडार, कुक्कुट पालन केंद्रे, पतपेढी, निवास, अशी क्षेत्रे सहकार कायद्याने व्यापलेली आहेत. सरकारच्या धोरणामुळे विमा व परिवहन क्षेत्र सुद्धा सहकारी चळवळीसाठी खुले झाले आहे. मात्र महिला बचत गट हे क्षेत्र सुद्धा सहकारी चळवळीत सामील करायला हवे. या बरोबर आपल्या देशाला आयुर्वेदाची थोर परंपरा आहे यामुळे आयुर्वेदिक औषधी निर्माण क्षेत्रात सहकारी आस्थपनास परवानगी मिळायला हवी.

ग्रामीण अर्थव्यवस्था व रोजगार निर्मिती:

ऊस कारखान्यांमध्ये केवळ साखरेवर भर न देता इथेनॉल, सीएनजी आणि वीज निर्मितीसारखे उप-उद्योग (By-products) कायद्याने अनिवार्य केल्यास कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर FRP मिळेल आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

निर्यातीभिमुख उत्पादने

निर्मितीवर सहकारी क्षेत्राने भर द्यायला हवा. सहकार क्षेत्रातील उत्पादने विशेषतः खाद्य उत्पादने आंतरराष्ट्रीय स्तरावर विकली जातील यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. शेती उत्पादने, फळे व फुले उत्पादने, प्रक्रिया केलेली खाद्य उत्पादने आंतरराष्ट्रीय दर्जानुसार तयार करून त्यांची निर्यात केल्यास देशाला परकीय चलन मिळेल व सहकारी संस्थांचे आर्थिक उत्पन्नही वाढेल.

श्री .अजित हरेश पाटील
मुख्य संपादक
शिवस्वराज्य न्यूज नेटवर्क
पाटील हाऊस होली क्रॉस रोड पोईसर कांदिवली पश्चिम.
मुंबई ४०० ०६७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button