आखाती युद्धामुळे निर्माण झालेली गॅसटंचाई, वाढलेल्या किंमती, उतरलेला शेअर बाजार, मरगळलेली संसद असे असूनही यंदा रामनवमीचा उत्साह गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. देशात विविध ठिकाणी रामनवमी सोहळा उत्साहात सुरू झाला असून अयोध्या येथील राममंदिर व देशातील अनेक राम मंदिरांत रामल्ललाचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत.
महाराष्ट्र राज्यासाठी रामनवमी महत्वाचा सण आहे याचे कारण वनवासात असताना राम सीता व लक्ष्मणाने बराच काळ दंडकारण्यात व्यतीत केला होता. नाशिकचे काळाराम मंदिर हा
रामजन्म सोहळ्याचा प्राचीन केंद्रबिंदू मानला जातो. येथील रथयात्रा सोहळ्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी रामनवमी निमित्त भंडारा आयोजित केला जातो. यंदा गॅस टंचाई असली तरी काही मंडळे व संस्थांनी गॅस सिलेंडरची तरतूद करून ठेवली आहे तर काही मंडळांनी चक्क चूली वापरण्याची तयारी ठेवली आहे.
————————विठ्ठल चव्हाण विशेष प्रतिनिधी