hi Hindi en English mr Marathi ur Urdu
आंतरराष्ट्रीयजीवनशैलीटॉप न्यूजताज्या बातम्याधर्म / ज्योतिषराजकारणराष्ट्रीयशिक्षण

आमीर खान निकाह का करत नाही ?

विशेष संपादकीय

​शिवस्वराज्य न्यूज: विशेष संपादकीय
​​- अजित पाटील (संपादक, शिवस्वराज्य न्यूज)

भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमीर खान हा सध्या त्याच्या व्यावसायिक चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर अधिक चर्चेत असतो. नुकताच त्याने वयाच्या ६१ व्या वर्षी ४७ वर्षीय गौरी स्प्रॅट या महिलेशी स्पेशल मॅरेज कायद्यानुसार विवाह केला. या पार्श्वभूमीवर, “भारतात अशी कायदेशीर परवानगी आहे का?” आणि “यातून कोणाचा धार्मिक अपमान होतो का?” या प्रश्नांवर कायद्याच्या आणि सामाजिक संवेदनशीलतेच्या चौकटीतून प्रकाश टाकणे गरजेचे आहे.स्पेशल मॅरेज कायदा काय आहे हे सुद्धा समजून घेतले पाहिजे.

कथित तिसऱ्या लग्नाची वस्तुस्थिती काय?
​सर्वप्रथम वस्तुस्थिती समजून घेणे महत्त्वाचे आहे. आमीर खानने ​वयाच्या २१ व्या वर्षी रीना दत्ता या युवतीशी विवाह केला होता. तो चित्रपटात काम करत असल्याने व रीनाच्या घरच्यांचा विवाहाला विरोध असल्याने सुरुवातीची काही वर्षे त्याने याबाबत अगदी घरच्यांनाही कल्पना दिली नाही. हा विवाह २००२ सालपर्यंत टिकला. म्हणजे सुमारे १६ वर्षे, या दरम्यान आमीर खान व रीना मध्ये टोकाचे मतभेद होऊ लागले व त्यानंतर त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.

लगान चित्रपटाच्या सेटवर आमीर खान व किरण राव यांची भेट झाली. रीना दत्ताकडे आमीर एक कुमारवयीन आकर्षण म्हणून ओढला गेला होता तर किरण रावची बुद्धिमत्ता व चित्रपट क्षेत्राचे तिचे ज्ञान पाहून आमीर प्रभावित झाला. त्यावेळी आमीर ४० वर्षाचा होता. त्यामुळे एक उत्तम जीवनसाथी म्हणून त्याने किरण रा निवड केली आणि २००५ मध्ये विवाह केला. हा विवाह सुद्धा योगायोगाने १६ वर्षे टिकला.

आता लेखाच्या शीर्षकात उपस्थित केलेल्या महत्वाच्या प्रश्नाबाबत चर्चा करुयात. आमीर खानने पहिले लग्न गुपचूप व घाईत केले होते म्हणजे ते विवाह नोंदणी कायद्यांनुसार केले होते. दुसरे व तिसरे लग्न त्याने स्पेशल मॅरेज कायद्यानुसार केले आहे.

विशेष विवाह कायदा काय आहे ? विशेष विवाह कायदा म्हणजे स्पेशल मॅरेज ॲक्ट हा १९५४ रोजी संमत झाला व या कायद्यानुसार कोणतीही भारतीय व्यक्ती कोणत्याही धर्म, जाती, व राष्ट्रीयत्वच्या व्यक्तीशी विवाह करू शकते मात्र त्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात. या विवाहात धर्म बदलण्याची गरज नसते किंवा विशिष्ट धार्मिक  चालिरीतींचे पालन करण्याची गरज नसते.

भारतीय कायद्यानुसार अशी परवानगी आहे का?
​”भारतात एखादी व्यक्ती असे करू शकते का?” या कायदेशीर प्रश्नाचे उत्तर होय असे आहे, परंतु त्यासाठी काही नियम आहेत:
​घटस्फोटानंतर पुनर्विवहाचा अधिकार: भारतीय कायद्यानुसार (मग तो ‘हिंदू विवाह कायदा’ असो, ‘मुस्लिम वैयक्तिक कायदा’ असो किंवा ‘स्पेशल मॅरेज ऍक्ट’ असो), जर एखाद्या व्यक्तीचा पहिल्या जोडीदाराशी कायदेशीररीत्या घटस्फोट (Divorce) झाला असेल, तर ती व्यक्ती दुसरे, तिसरे किंवा त्यानंतरही लग्न करण्यास कायद्याने पूर्णपणे स्वतंत्र आहे.
​एकपत्नीत्वाचा नियम: जोपर्यंत पहिला जोडीदार जिवंत आहे आणि कायदेशीर घटस्फोट झालेला नाही, तोपर्यंत दुसरे लग्न करणे हा भारतीय दंड संहितेनुसार (IPC) गुन्हा ठरतो. आमीर खानच्या बाबतीत, त्याचे दोन्ही विवाह कायदेशीर घटस्फोटानंतरच संपुष्टात आले आहेत, त्यामुळे भविष्यात त्याने लग्न केल्यास ती पूर्णपणे त्याची वैयक्तिक आणि कायदेशीर निवड असेल.
​धार्मिक अपमान की वैयक्तिक स्वातंत्र्य?
​सोशल मीडियावर काही घटकांकडून या विषयाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, लोकशाही देशात विवाह आणि घटस्फोट हा पूर्णपणे एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक अधिकार (Right to Privacy and Personal Liberty) मानला जातो.
​भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला त्याचे वैयक्तिक आयुष्य कशा प्रकारे जगावे, याचे स्वातंत्र्य दिले आहे.
​कोणत्याही व्यक्तीने कायद्याच्या चौकटीत राहून लग्न किंवा घटस्फोट केल्यास, त्याला कोणत्याही धर्माचा किंवा संस्कृतीचा अपमान मानले जात नाही. भारतामध्ये सर्व धर्मीय नागरिकांना (यात अनेक हिंदू, मुस्लिम आणि इतर धर्मीय सेलिब्रिटी व सामान्य नागरिक समाविष्ट आहेत) कायदेशीर घटस्फोटानंतर पुन्हा विवाह करण्याचा समान अधिकार आहे.

​’शिवस्वराज्य’ मत: सेलिब्रिटींचे आयुष्य आणि सोशल मीडियाची जबाबदारी
​चित्रपट जगतातील व्यक्तींचे आयुष्य नेहमीच ग्लॅमर आणि कॅमेऱ्याच्या विळख्यात असते. अनेकदा त्यांच्या वैयक्तिक निर्णयांचे विनाकारण सामाजिकीकरण केले जाते किंवा त्याला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न होतो. एक सुजाण समाज म्हणून आपण कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णयांकडे कायदा आणि मानवी अधिकारांच्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे.
​अफवांवर विश्वास न ठेवता, कायद्याचे राज्य आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर करणे हेच एका प्रगतीशील समाजाचे लक्षण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button