ताज्या बातम्याराष्ट्रीय
IPL 2026 – आयपीएल मधील प्रभावी खेळाडू पद्धत कायम राहणार
सर्व आयपीएल संघाच्या कर्णधार बैठकीत बीसीसीआय निर्णयावर ठाम
आयपीएल २०२६ च्या रंगतदार लढती सुरू होण्याअगोदर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बोलावलेल्या आयपीएल संघाच्या कर्णधाराच्या बैठकीत प्रभावी खेळाडू (Impact Player) पद्धत कायम राहणार असल्याचे निश्चित झाले. सर्व आयपीएल कर्णधार या पद्धतीच्या विरोधात असेल तरी आणखी काही वर्षे ही पद्धत कायम राहणार असल्याचे सूतोवाच मंडळाने केले.
प्रभावी खेळाडू मुळे अष्टपैलू खेळाडूवर अन्याय होत असल्याचे मत क्रिकेट अभ्यासकांनी याआधी मांडले आहे तरीही मंडळ या नियमात बदल करायला तयार नाही.
या बैठकीला हार्दिक पांड्या, ईशान किशन, शुभमन गिल्ल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, रजत पाटीदार, रियान प्रयाग व रिषभ पंत हे सर्व कर्णधार उपस्थित होते.