प्रचंड पावसातही शिवसेनेचे रामरक्षा आंदोलन यशस्वी
आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत, किशोरी पेडणेकर उपस्थित

प्रचंड पाऊस, वाहतूक खोळंबा तरीही अयोध्येतील राममंदिर देणगी चोरी विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आयोजित दादरच्या हनुमान मंदिरातील रामरक्षा आंदोलन अपेक्षेपेक्षा यशस्वी झाले.
या आंदोलनात शिवसेना पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे, युवा नेते व आमदार आदित्य ठाकरे, संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, माजी महापौर किशोरी पेडणेकर व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.
राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी शिवसेना पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, दादर येथील हनुमान मंदिरात रविवार ५ जुलै रोजी रामरक्षा पठण करून आंदोलनास मुबईपासून सुरुवात केली गेली आहे. अयोध्येतील राममंदिराला श्रद्धाळू भाविकांनी दिलेल्या देणगीवर राजरोस डल्ला मारला गेला असून, हा पैसा विरोधी पक्षांचे आमदार व खासदार फोडण्यासाठी वापरला गेल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला तर संजय राऊत यांनी शिवसेना पक्षाने राम मंदिराला दिलेल्या १ कोटी देणगी व १ किलोच्या चांदीच्या विटेची पावती देण्यात आली नाही याचा पुनरुच्चार केला आहे.
व्हिडिओ पहा