भारत देश बनतो आहे मधुमेहाची जागतिक राजधानी
चीननंतर सर्वात जास्त मधुमेहाचे रुग्ण भारतात ; धक्कादायक अहवाल
या लेखाचे प्रायोजक आहेत डायोनलो पावडर
भारत देश हा अतिशय वेगाने मधुमेहाची जागतिक राजधानी बनत आहे. चीन नंतर सर्वात जास्त मधुमेहाचे रुग्ण भारतात आढळतात. सुमारे दहा कोटी मधुमेहाचे रुग्ण आपल्या देशात असावेत असा एक अहवाल सांगतो याचा अर्थ असा की दहा व्यक्तींपैकी एक मधुमेही आहे. याचे कारण अतिशय तणावग्रस्त जीवनशैली, व्यायामाचा अभाव व फास्ट फुडचे सेवन.
याचा अर्थ असा नाही की मधुमेह आधुनिक जीवनशैलीमुळे निर्मित नवीन विकार आहे. सुमारे ३५०० वर्षापूर्वी मधुमेहाचे अस्तित्व होते. इजिप्तच्या लोकांनी पापायरास वनस्पतीपासून बनवलेल्या कागदावर मधुमेहाच्या लक्षणांचा उल्लेख केला आहे. चरक व सुश्रुत यांनी ५ व्या शतकात मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या मुत्राकडे मुंग्या आकर्षित होतात असे निरीक्षण नोंदवले होते. एवढेच नाही तर मधुमेहाच्या टाईप १ व टाईप २ या प्रकाराबाबत त्यांना कल्पना होती. मूत्राच्या रंगावरून मधुमेहाला विशिष्ट नाव देण्याची त्यांची पद्धत तर अचंबित करणारी होती.
आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून मधुमेह हा विकार मूत्र समस्येशी संबंधित विकाराच्या गटात येतो. ज्याला प्रमेह असे नाव आहे. प्रमेहाचे तीन गटांत विभाजन करण्यात आले आहे. हे विभाजन व्यक्तीच्या वात , कफ, पित्त प्रकृतीवरून करण्यात आले आहे.
वातज प्रमेह, कफज प्रमेह व पित्तज प्रमेह हे ते तीन प्रकार. या तीन प्रकारातील प्रमेहांचे पुन्हा एकूण वीस उपप्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. मुत्राच्या गुणधर्मावर आधारित हे वर्गीकरण आहे.
कफज प्रमेहात एकूण दहा प्रकार असतात. मुत्राच्या रंगावरून हे प्रकार पडले आहेत, ते खालीलप्रमाणे,
उदकमेह : या प्रमेहात मूत्राचा रंग पाण्यासारखा स्वच्छ व दुर्गंधरहित असतो.
इक्षुमेह : या प्रकारात मुत्राचा रंग उसाच्या रसासारखा पिवळा व गंध मधुर असतो.
सांद्रमेह : मूत्र या प्रकारात दाट व फेसयुक्त असते.
सुरामेह: मुत्राचा रंग एखाद्या सुरेसारखा म्हणजे दारू सारखा असतो. एखाद्या काचेच्या भांड्यात असे मूत्र घेतल्यास वर नितळ आणि खाली गढूळ दिसते.
पिष्टमेह: या प्रमेहात मूत्र पांढुरके व दाट एखाद्या पीठ मिसळलेल्या पाण्यासारखे दिसते.
शुक्रमेह : शुक्रमेहात मुत्रात वीर्याचे घटक आढळतात. असे मूत्र दिसायला पांढरे व विर्यासारखे चिकट असते.
सिक्तमेह : या प्रमेहात मूत्रात अतिशय सूक्ष्म कण आढळतात. एखाद्या स्फटीकासारखे हे कण असतात.
शीतमेह : मूत्र अतिशय थंड असते व गंध गोड असतो.
शनैरमेह : या प्रमेहात लघवी अतिशय हळूहळू होते व वारंवार लघवीची भावना होते.
आलममेह : मूत्र लाळेप्रमाणे चिकट असते.
कफज प्रमेहाचे वरील प्रकार साध्य मानले जातात म्हणजे आहार व जीवनशैलीतील बदलाने ठीक केले जाऊ शकतात.
पित्तज प्रमेहाचे एकूण सहा प्रकार असतात. हे प्रकार यप्य म्हणजे अतिशय नियंत्रित आहार व योग्य त्या औषधोपचाराने बरे केले जाऊ शकतात. ते खालील प्रमाणे :
क्षारमेह : क्षारमेह या प्रमेहात मूत्र अल्कली गुणधर्माचे म्हणजे साबणाच्या पाण्यासारखे फेसाळ असते.
कालामेह : मूत्र काळपट रंगाचे, दुर्गंधीयुक्त असते व मोठ्या प्रमाणात लघवीची भावना होते.
नीलामेह : मूत्र निळसर किंवा फिकट निळसर रंगाचे असते.
रक्तमेह : मूत्र रक्तवर्णी असते म्हणजे लालसर रंगाचे असते. मूत्रातून कधी कधी रक्तही जाते.
मंजिष्ठमेह: या प्रमेहात मूत्र मंजिष्ट वनस्पतीच्या रसासारखे नारिंगी व लालसर असते.
हरिद्रमेह: हरिद्र म्हणजे हळद. नावाप्रमाणे हळदीच्या रंगाचे म्हणजे दाट पिवळ्या रंगाचे मूत्र असते.
वातज प्रमेहाचे एकूण चार प्रकार असतात जे असाध्य मानले जातात. ते खालीलप्रमाणे :
वसामेह: वसामेह म्हणजे मुत्रातून शरीरातील वसेचा म्हणजे चरबीचा अंश बाहेर पडतो. असे मूत्र तेलासारखे चिकट असते.
मज्जामेह : शरीरातील अस्थीमज्जेचा म्हणजे बोनमॅरोचा सूक्ष्म प्रमाणात अंश मुत्रातून बाहेर पडतो
हस्तीमेह : या प्रमेहात लघवी नियंत्रित प्रमाणात होत नाही व मोठ्या प्रमाणात लघवी होते.
मधुमेह : या प्रमेहात मूत्र मधाप्रमाणे मधुर असते. हाच. शेवटचा प्रमेह आज आपल्या जीवनात ठाण मांडून बसला आहे व अनेक रोगांचे कारण बनला आहे. या प्रमेहामुळे शरीरातील जीवनतत्व नष्ट होते. हृदयविकार, अधूदृष्टी व अनेक विकारांना हाच मधुमेह कारणीभूत असतो.
मधुमेह विकार जरी मानला गेला नसला तरी अनेक विकारांना चालना देणारी परिस्थिती निर्माण करतो. यावर अनेक औषधे आज बाजारात असली तरी ती मधुमेह नियंत्रित करू शकतात पूर्ण बरा करू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आयुर्वेदिक औषधांनी मधुमेह नियंत्रण करता येते. मात्र त्यात एक त्रुटी आहे.
आमच्या प्रायोजकाविषयी :
बऱ्याचदा जी वनौषधी आयुर्वेदिक औषधे, काढे, अवलेह बनवताना वापरली जाते ती दोषयुक्त असते.वनौषधींची मुळे जीवाणूयुक्त असतात कारण ती मातीत असतात. मातीत जसे चांगले जीवाणू असतात तसे घातक जीवाणूही असतात. औषधे बनवताना ही माती साफ केली गेली नाही तर हे जीवाणू औषधात मिसळू शकतात.अनेकदा ही माती साफ केली जात नाही व घातक जीवाणू आयुर्वेदिक औषधात मिसळून जातात.

हेच लक्षात आल्याने वीस वर्षे औषधी क्षेत्रात काम करणारे श्री. दिवाकर दळवी यांनी अत्याधुनिक गामा रे तंत्रज्ञान वापरून वनस्पतीतील जीवाणू नष्ट करण्याचे अमेरिकन तंत्रज्ञान औषध निर्मितीत वापरले. अमेरिका व युरोपात अन्नातील जीवाणू नष्ट करण्यासाठी गामा रे तंत्रज्ञान वापरले जाते. यामुळे जीवाणूतील पेशी नष्ट होतात व जीवाणू नष्ट होतात. अन्न विषबाधा होत नाही. गामा किरण लगेच नाहीसे होत असल्याने अन्नावर त्यांचा काही अंश राहत नाही.
श्री दिवाकर दळवी यांच्या ओम सुमूख इंटरप्रायजेस या शासनमान्य व नोंदणीकृत कंपनीने हे तंत्रज्ञान वापरून भारतातील पहिली मधुमेहावरील जीवाणूमुक्त आयुर्वेदिक औषधी पावडर डायोनलो बनवली आहे. मधुमेहावर गुणकारी अशा १५ आयुर्वेदिक वनस्पती समप्रमाणात घेऊन मधुमेहावर अतिशय प्रभावी पावडर त्यांनी बनवली आहे. ही औषधी पावडर एफएसएसएआय ( भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) द्वारे मान्यताप्राप्त आहेच शिवाय गामा रे शुद्धीकरण तंत्रज्ञान प्रक्रियेचे प्रमाणपत्र रेडिएशन प्रोसेसिंग सर्टिफिकेट सुद्धा या औषधीला ऍग्रोसर्ज कंपनीद्वारे मिळाले आहे.
अतिशय माफक किमतीत ते ही पावडर जनतेला व आयुर्वेद तज्न आणि वैद्यांना देत आहेत. या औषधी पावडर साठी ओम सुमूख इंटरप्रायजेस कंपनीशी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा :
For Order
OM SUMUKH ENTERPRISES
Call : 98 92 22 51 21
or Email – diwakardalvi@gmail.com
लेखक राजेंद्र आजगावकर वनौषधी संशोधक




