ॐकार संस्कार केंद्रातर्फे ॐकार उपासना
संपूर्ण स्वास्थ्यासाठी २१ भागांची विशेष मालिका यू ट्यूब वर

ॐकार संस्कार केंद्र सादर करत आहे “संपूर्ण स्वास्थ्यासाठी ॐकार उपासना” या २१ भागांच्या विशेष मालिकेचा
प्रास्तविक ध्वनीचित्रफीत (Introductory Video)
या भागात ॐकार उपासनेविषयीच्या सर्व मूलभूत प्रश्नांची उत्तरे मिळतील
अस्मिता शरद देव
संस्थापिका व संचालिका ॐकार संस्कार केंद्र
नमस्कार 🙏
ॐकार संस्कार केंद्रातर्फे आम्ही घेऊन येतोय “संपूर्ण स्वास्थ्यासाठी ॐकार उपासना” हा कोर्स एका नवीन स्वरूपात.
हा कोर्स आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर २१ भागात सादर करणार आहोत. ज्यांना परिपूर्ण रूपात ॐकार उपासना शिकायची असेल ते आपल्या सोयीच्या वेळात जिथे असाल तिथून ॐकार शिकू शकता. फक्त एकच काळजी घ्यायची की पहिल्यापासून ओळीने एकेक भाग बघायचा, ऐकायचा. अन्यथा त्यात सुसूत्रता राहणार नाही.
ध्यान म्हणजे नेमके काय?
ॐकाराचा नाद का महत्त्वाचा आहे?
ध्यानाची सुरुवात कशी करावी?
मन शांत कसे करावे?
स्वतःला कसे ओळखावे?
या मालिकेच्या पहिल्या भागात अस्मिता शरद देव या सर्व मूलभूत प्रश्नांची सोप्या, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून उत्तरे देत आहेत.
या मालिकेत पुढील भागांमध्ये आपण जाणून घेणार आहोत:
ॐकाराचे विज्ञान
ध्यानाची योग्य पद्धत
श्वास आणि प्राण
मनाची एकाग्रता
अंतर्मनाचा प्रवास
🙏 नवीन भागांसाठी Aumkar Sanskar Kendra ला Subscribe करा आणि Bell Icon दाबा.आज सादर करत आहोत ॐकार उपासनेचा Introductory Video ज्यात आपल्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची, शंकांची उत्तरं मिळतील.ऐका तर मग अन् like, share and subscribe करा म्हणजे अनेकांना ह्याचा लाभ घेता येईल.
केंद्राची थोडक्यात माहिती
१९९८ मध्ये स्थापन झालेल्या ह्या केंद्रात संपूर्ण स्वास्थ्यासाठी ॐकार उपासना, बाल संस्कार वर्ग, पाणिनीय / परसवर्ण पध्दतीने श्रीगणपति अथर्वशीर्ष पठण वर्ग, श्रीसूक्त पठण वर्ग, श्री लक्ष्मीमातेचे संक्षिप्त पूजन इत्यादि वर्ग घेतले जातात. गेल्या सहा वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे आम्ही हे सर्व वर्ग गुगल मीटद्वारा ॲानलाइन घेतो. ह्या वर्गांना महाराष्ट्रातील कानाकोप-यातून, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश; तसेच अमेरिका, हॅांगकॅांग, दुबई, आयर्लंड इत्यादि ठिकाणचे लोक सहभागी होतात.