मुंबई सुरक्षित नाही : भाजपच्या आमदाराचा महापालिकेला घरचा आहेर
पोयसर, कांदिवली अतिक्रमणावरून मनपा अधिकाऱ्यांवर टीका
मुंबई सुरक्षित नाही. मुंबईतील कांदिवली पोयसर भागातील सरकारी रस्त्यावर अनधिकृत कब्जा करण्यात आला आहे व असा कब्जा होत असताना डोळे मिटून बसणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांची चौकशी करावी असा घरचा आहेर भाजपचे आमदार योगेश सागर यांनी आज भाजपची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेला दिला.
भर पावसात कांदिवली पश्चिम येथील पोयसर भागात योगेश सागर पाहणीसाठी आले होते. त्यावेळी ६ फुटी सर्व्हिस रोड व महापालिकेला दिलेला ११ फुटी रस्ता यावर मस्जिद, चर्च व छोटी मंदिरे उभारून अनधिकृत कब्जा केल्याचे त्यांना आढळले.
यावर कठोर प्रतिक्रिया व्यक्त करत असा कब्जा होत असताना दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सक्त कारवाई व्हावी त्यांची विभागनिहाय चौकशी व्हावी असे आवाहन त्यांनी महापालिका आयुक्तांना केले. तसेच हे ठिकाण मेट्रो कारशेड, मुंबईतील महत्वाच्या रस्त्याजवळ असल्यानं संवेदनशील आहे. अशा स्थितीत ही अतिक्रमणे तात्काळ हटविण्यात यावीत, अशी विनंती त्यांनी आयुक्तांना केली.
यावेळी आमदार योगेश सागर यांच्यासोबत महापालिकेचे पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी, आर दक्षिण विभाग सहाय्यक आयुक्त आरती गोळेकर उपस्थित होत्या.
अजित पाटील शिवस्वराज्य न्यूज दि १२ ऑगस्ट २०२६