वाचन चळवळ समृध्दीसाठी व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मनपा शाखांच्या अनुदानासाठी मी कटिबद्ध!- महापौर रितू तावडे
मुंंबईच्या महापौर रितू तावडे यांनी शनिवारी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित करण्यात आलेल्या मुंबई शहर ग्रंथोत्सवाला भेट दिली.
याप्रसंगी त्यांच्या हस्ते मुंबईतील सार्वजनिक ग्रंथालयातील उत्कृष्ट अबालवृध्द सभासदांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी रितू तावडे यांनी सर्व उपस्थित वाचकांशी संवाद साधला, ” शालेय व महाविद्यालयीन वाचकांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहून आनंद वाटला आणि यासाठीच मुंबईत असलेल्या वाचक चळवळ दमदारपणे टिकवून वृध्दींगत करणाऱ्या ग्रंथसंग्रहालयाचे महत्त्व मोठे आहे म्हणताना
याप्रसंगी वाचनाचे महत्त्व त्यांनी विशद केले.दुर्मिळ ग्रंथ जतन करणे ते समृद्ध करणे आवश्यक आहेत असे सांगितले आणि त्याचबरोबर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मनपाच्या ग्रंथालयाच्या शाखा चालवते त्यांच्या अनुदान वाढीसाठी दिलेल्या प्रस्तावासाठी माझा कायम सहभाग असेल. त्यासाठी मी निश्चितच सहकार्य करण्यास कटिबद्ध असेन .” असे त्यांनी आवर्जून सांगितले.
या प्रसंगी व्यासपीठावर
भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
अरुण गिते ,
जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई शहर शशिकांत काकड मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे, कार्याध्यक्ष शीतल करदेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
यानंतर रितू तावडे यांनी ग्रंथसंग्रहालयात लागलेल्या प्रकाशकांच्या पुस्तक प्रदर्शनास भेट दिली आणि समाधान व्यक्त केले.
तसेच या प्रदर्शनातील महाराष्ट्र सरकारच्या ‘शासकीय मुद्रण व लेखनसामग्री संचालनालयाच्या
स्टाॅल’ला भेट देऊन ग्रंथ पहाणी करताना ‘भारताचे संविधान’ हा ग्रंथ( सुधारित २०२५) खरेदी केला.
तसेच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्याध्यक्ष शीतल करदेकर यांना ‘हा ग्रंथ सर्व नगरसेवकांकडे असायला हवा.’ या सूचनेचे स्वागत करुन याबाबत उचित नियोजनबद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच महापौर रितू तावडे यांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागात शनिवारी लावलेल्या दुर्मिळ पुस्तकांच्या संदर्शनालाही भेट दिली. अतिशय आत्मियतेने ही पुस्तके पाहून आनंद व्यक्त केला.
तसेच ग्रंथसंग्रहालयातील महाराष्ट्र शासनाने वितरित केलेल्या निधीतून सुरु असलेल्या जो अंकीकरण प्रकल्पाचीही पहाणी (Digitalization)केली.
स्कॅनिंग काम कसे चालते याची प्रत्यक्ष पहाणी केली.
याप्रसंगी संदर्भ विभागाच्या ग्रंथपाल मिताली तरळ व त्यांचे सर्व सहकारी, कार्यवाह उमा नाबर, जयवंत गोलतकर,विनायक परब आदि सदस्य , पदाधिकारी तसेच वाचक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
या धावत्या पण अभ्यासपुर्ण समृध्द भेटीत ग्रंथोत्सवाचे व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कामाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या!