hi Hindi en English mr Marathi ur Urdu
ताज्या बातम्या

भारनियमनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल सामने दुपारच्या सत्रात घेण्याबाबत मागणी

वीजेचे संकट असताना आयपीएल साठी वीजेची उधळपट्टी का ?

शिवस्वराज्य न्यूज – अजित पाटील
भारनियमनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल सामने दुपारच्या सत्रात घेण्याबाबत मागणी सध्या राज्याच्या जनतेतून होत आहे. सध्या राज्यात वाढत्या वीज तुटवड्यामुळे अनेक भागांमध्ये भारनियमन (लोडशेडिंग)ची समस्या गंभीर होत चालली आहे. अशा परिस्थितीत देशभरात सुरू असलेल्याआयपीएल २०२६ चे सामने प्रामुख्याने संध्याकाळच्या वेळेत आयोजित केले जात आहेत. या वेळेतच वीजेचा वापर सर्वाधिक असतो, त्यामुळे नागरिकांना दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक आणि विद्यार्थी यांना आधीच लोडशेडिंगचा मोठा फटका बसत आहे. त्यातच आयपीएल सामने पाहण्यासाठी होणारा अतिरिक्त वीज वापर परिस्थिती अधिकच बिकट करत आहे.
त्यामुळे महाराष्ट्र शासन, वीज वितरण कंपन्या तसेच संबंधित क्रीडा आयोजकांनी याची तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे. संध्याकाळच्या वेळेत सामने आयोजित करण्याऐवजी ते दुपारच्या सत्रात घेण्यात यावेत, जेणेकरून वीजेवरील ताण कमी होईल आणि लोड शेडिंगची तीव्रता काही प्रमाणात कमी करता येईल.
शिवस्वराज्य न्यूज तर्फे ही मागणी करण्यात येत असून, संबंधित यंत्रणांनी यावर गांभीर्याने विचार करून तातडीने योग्य निर्णय घ्यावा, ही विनंती.
– अजित पाटील
शिवस्वराज्य न्यूज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button