hi Hindi en English mr Marathi ur Urdu
आंतरराष्ट्रीयआरोग्यक्रीडागुन्हेताज्या बातम्या

व्हिक्टर ओर्बान यांच्या पराभवाने ट्रम्प, नेतान्याहू यांना धक्का

हंगेरीत कट्टर उजव्या विचारसरणीच्या फिडेस पक्षाचा पराभव

RAVINDRA MADHUKAR Contributing Editor

हंगेरी या पूर्व युरोपातील देशाच्या सर्वोच्च पदी गेली १६ वर्षे ठाण मांडून बसलेले व्हिक्टर ओर्बान यांच्या फिडेस पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व इस्राएलचे अध्यक्ष बेंजामिन नेतान्याहू यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचेही व्हिक्टर कट्टर समर्थक मानले जात होते.

कट्टर उजवी राष्ट्रवादी भूमिका, स्थलांतरित व मुस्लिमांना विरोध, मोजक्या उद्योगपतींचे भले करणे, लोकशाही मार्गाने निवडून आल्यावर लोकशाही संस्थांची गळचेपी, इस्राएलच्या नरसंहार व युध्दखोरीला पाठिंबा, युक्रेन वरील रशियाच्या आक्रमणाला पाठिंबा, इराण अमेरिका युद्धात अमेरिकेची बाजू घेणे यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या व्हिक्टर यांनी २०१० साली हंगेरीच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर ते सलग तीनदा निवडून आले.

सुरुवातीला कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असलेल्या व्हिक्टर यांनी हंगेरीच्या सैन्यात एक अधिकारी म्हणून काम करायला सुरुवात केल्यानंतर उजव्या विचारसरणीच्या ते प्रेमात पडले. त्या काळात जगातील मागास देशातून हंगेरीत स्थलांतरित येवू लागले होते. यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण पडू लागला. त्याचा फायदा उठवत प्रथम फिडेस पक्षाच्या नेतृत्वपदी व नंतर  लोकांना आवडेल अशी भाषणबाजी करत चक्क देशाच्या पंतप्रधान पदावर त्यांनी ताबा मिळवला तो २०१० साली.

एकदा निवडून आल्यानंतर मात्र लोकशाही मार्गाचा त्याग त्यांनी केला. लोकशाही संस्था, न्याय व्यवस्था, प्रसार माध्यमे यांच्यावर आपली पकड कायम केली. उदारमतवादी युरोपियन युनियन च्या निर्णयास विरोध सुरू केला. रशियाच्या युक्रेन वरील आक्रमणाला पाठिंबा दिला. पुतीन यांच्याशी दोस्ती करून अव्याहत गॅस व खनिज तेलाचा पुरवठा कायम राहील अशी व्यवस्था केली. इस्रायलच्या युद्धखोरीला विरोध केला नाही उलट त्याचे समर्थन केले. या उपकाराची परतफेड म्हणून या वर्षी झालेल्या निवडणुकीत  नेतान्याहू यांच्या मुलाने व्हिक्टर यांच्या पक्षाचा प्रचार केला. तरीही व्हिक्टर यांचा दारुण पराभव झाला.

याला कारण ठरले त्यांच्याच पक्षाचे एक तरुण नेता पिटर मज्यार. मज्यार यांनी एक ध्वनिफीत प्रसिद्ध केली त्यात व्हिक्टर यांच्या पक्षातील भ्रष्टाचार उघड केला गेला. सरकार कसा ठराविक उद्योगपतीना पाठिंबा देते व त्यासाठी कमिशन वसूल करते हे त्यांनी उघड केले. बांधकाम, ऊर्जा, वाहतूक, बँकिंग व प्रसार माध्यमातील लोरींक मेझारोस, लाझली सिझ, झोल्ट निगेरेस इत्यादी धनदांडग्या उद्योगपतींसाठी व्हिक्टर यांचे सरकार कसे मदत करत होते हे उघड झाल्यानंतर हंगेरीतील लोक खवळले होते. इस्वान टिबोरझ या स्वतःच्या जावयाला तर त्यांनी मुक्तहस्ते सरकारतर्फे कर्जे दिली होती. याचा परिणाम असा झाला की देशातील लोकांनी मोठ्या संख्येने मतदान करून सत्तेवरून त्यांना खाली खेचले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button