शंभर कोटी डॉलर्स द्या व सर्वात सुंदर स्त्री द्या
युगांडाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कस्तानला धमकी

युगांडा देशाचा लष्कर प्रमुख मुहूजी कैनेरुगाबा याने नुकतीच तुर्कस्तान कडे विचित्र मागणी केली आहे. त्याने चक्क १०० कोटी डॉलर्स व सर्वात सुंदर तुर्की स्त्री ची मागणी तुर्कस्तान सरकारकडे केली आहे. सोमलियातील तुर्कस्तानच्या वाढत्या प्रभावामुळे अस्वस्थ झालेल्या मुहूजी यांनी ही विचित्र मागणी केली आहे.
तसेच इस्राएलच्या रक्षणासाठी दहा हजार सैनिक पाठवण्याची घोषणाही केली आहे. मुहूजी अशा विचित्र मागण्या करण्यासाठी कुप्रसिध्द आहेत . २०२२ साली इटली देशाच्या पंतप्रधान मेलोनी यांना विवाह प्रस्ताव देण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. सुमारे शंभर गायींच्या बदल्यात मेलोनी यांच्याशी लग्न करण्याची त्यांची इच्छा होती. त्या नंतर त्यांचे पिता व युगांडाचे राष्ट्रपती योवेरी मुसवेनी यांनी मेलोनी यांची माफी मागितली होती.
सोमालियात तुर्कस्तान देशाने अनेक विकास कामे केली आहेत. तेथील सर्वात महत्वाचे बंदर मोगादिशू हे तुर्कस्तानच्या खाजगी कंपनीच्या नियंत्रणाखाली आहे. सोमालिया एक आफ्रिकी देश व तो तुर्कस्तान सारख्या युरोप व आशियाई खंडातील तुर्कस्तानच्या कलाने वागतो आहे हे युगांडाच्या या विक्षिप्त लष्कर प्रमुखाला पसंत नाही. सोमालियातील अतिरेकी संघटनाच्या कारवायाना आपण आळा घातल्याचा त्यांचा दावा आहे.
रवींद्र मधुकर शिव स्वराज्य न्यूज साठी